इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करणे गरजेचे ः कांबळे

इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत 
करणे गरजेचे ः कांबळे
Published on

55505
इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत
करणे गरजेचे ः कांबळे

विद्यामंदिरमध्ये इंग्रजी भाषा दिवस

कणकवली, ता. ४ : इंग्रजी भाषा ही जगाकडे बघण्याची खिडकी आहे. आज मोबाईल, संगणक, इंटरनेट सर्वच क्षेत्रांत इंग्रजी भाषा व्यापली आहे. त्यामुळे आजच्या पिढीने इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. पिराजी कांबळे यांनी केले.
विद्यामंदिर हायस्कूलमध्ये इंग्रजी भाषा दिवस कार्यक्रम झाला. यात डॉ. कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून विविध कविता, गाणी, भाषणे, गोष्टी तसेच नाटिका सादर केल्या. इंग्रजी भाषेची आवड लागावी, इंग्रजी पुस्तकांचे वाचन वाढावे, तसेच इंग्रजीतून बोलण्यास संधी मिळावी यासाठी वर्षभरात घेतलेल्या निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, भाषण स्पर्धा, पोस्टर्स मेकिंग स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदनही विद्यार्थ्यांनीच इंग्रजीमधून केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या इंग्रजी विषय शिक्षिका संगीता साटम, वैभवी हरमलकर, वेदांती तायशेटे आणि विलास ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com