पिंगुळीत सोमवारी ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’

पिंगुळीत सोमवारी ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’
Published on

55508


पिंगुळीत सोमवारी ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’

मार्च २०२६ पर्यंत विविध कार्यक्रम; वर्षभर उपक्रम राबविणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पिंगुळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान विविध उपक्रमांनी राबविण्यात येणार आहे. याचा प्रारंभ सोमवारी (ता.७) सकाळी नऊ वाजता भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीने होणार आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी पिंगुळी ग्रामपंचायत ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे सरपंच अजय आकेरकर यांनी सांगितले. या वर्षभरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायत पिंगुळीतर्फे ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सरपंच आकेरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सागर रणसिंग, मंगेश चव्हाण, मंगेश मस्के, आर्या बांदेकर, केशव पिंगुळकर, शशांक पिंगुळकर, ग्रामसेवक राजेश निवतकर उपस्थित होते. श्री. आकेरकर म्हणाले, ‘‘या मोहिमेचा उद्‍घाटन सोहळा सात एप्रिलला सकाळी नऊ वाजता आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मोहिमेत परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, गावातील ग्रामस्थ, गावातील सर्व ग्रंथालयांचे अध्यक्ष, प्रतिनिधी, महिला बचत गट यांची उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, मे व जूनमध्ये शेतकऱ्यांना कृषीविषयी मार्गदर्शन शिबिर, खते बियाणे वाटप, वृक्ष लागवड कार्यक्रम, जुलै व ऑगस्टमध्ये आरोग्य तपासणी उपचार शिबिर, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये स्वच्छता व श्रमदान शिबीर राबवणे, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये महिलांसाठी व्यवसायभिमुख व रोजगार विषयक मार्गदर्शन व महिला बचत गटासाठी अभ्यास दौरे आयोजित करणे, जानेवारी २०२६ मध्ये पिंगुळी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, फेब्रुवारीमध्ये अपंग कल्याण आर्थिक व सामाजिक मागास उन्नती अभियान अंतर्गत विविध सहायता उपक्रम राबवणे आदी कार्यक्रम वर्षभर होणार आहेत.’’
---
विद्यार्थी, पालकांसाठी परिसंवादाचे आयोजन
दरम्यान, ग्रंथ दिंडी सोहळ्यानंतर परमपूज्य समर्थ राऊळ महाराज सभागृह येथे शालेय मुले व पालक यांच्यासाठी ‘मोबाईल, आजची मुले व पुस्तक, मुलांचे हरवलेले बालपण’ या विषयावर मार्गदर्शन व परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, ज्येष्ठ साहित्यिक भरत गावडे, प्रा. रुपेश पाटील, साहित्यिक वृंदा कांबळे यांचा सहभाग असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com