टुडे पान एक संक्षिप्त-भारतीय सैन्य दलात मोफत भरती प्रशिक्षण

टुडे पान एक संक्षिप्त-भारतीय सैन्य दलात
मोफत भरती प्रशिक्षण
Published on

भारतीय सैन्य दलात
मोफत भरती प्रशिक्षण
सिंधुदुर्गनगरी ः भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना निवड बोर्डच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाष्ट्रातील नवयुवक नवयुवतीसाठी ५ ते १४ मे या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ६१ आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे २९ एप्रिलला मुलाखतीस हजर रहाण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. या मुलाखत्तीस येतेवेळी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे (डीएसब्लू) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील एसएसबी-६१ या कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. एसएसबी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी कंम्बाईड डिफेन्स सव्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे, एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी, टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.petenashik@gmail.com किंवा दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत अथवा प्रत्यक्ष येऊन संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
-----------------
जिल्ह्यातील माजी सैनिकांना
संपर्क साधण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून २ ते ३ माजी सैनिकांची जिल्हा सैनिक कल्याण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करावयाची आहे. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक जे जिल्हा, तालुक्यातील आजी, माजी सैनिकांच्या परिवारांची भेट घेवून त्यांना देय असलेल्या शासकीय तथा अन्य योजनांची माहिती देतात व त्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करतात तसेच त्यांच्या अडी-अडीअचणीप्रसंगी आवश्यकतेनुसार गाव, तालुका, जिल्हास्तरीय प्रशासनाशी समन्वय साधून या अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असतात अशा माजी सैनिकांनी त्यांचे सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र, आधारकार्ड यांची छायांकीत प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग १५ एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व आजी ,माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता, त्यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक मंडळाची स्थापना करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या व्याप्तीनुसार ५ ते ९ व्यक्तींची जिल्हा सैनिक कल्याण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती, नेमणुका करावयाची आहे. या अशासकीय सदस्यापैकी ५० टक्के शक्यतो माजी सैनिक असावे. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. सुकटे यांनी केले आहे.
-----------------
''ईआर-१ विवरणपत्र
३० तारीखपर्यंत भरा''
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाचे मनुष्यबळाचे मार्च २०२५ ला संपलेल्या तिमाहीचे ईआर १ हे विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ अन्वये कलम ५ मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर १ प्रत्येक तिमाही संपल्यावर ३० दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. मार्च २०२५ ला संपलेल्या तिमाहीचे विवरणपत्र, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक, आस्थापनांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शेख यांनी केले आहे.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com