देवगडात शुक्रवारी लोकशाही दिन

देवगडात शुक्रवारी लोकशाही दिन
Published on

55527

देवगडमध्ये शुक्रवारी लोकशाही दिन

तहसीलमध्ये आयोजन : उपस्थित राहण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ : तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय संवर्णकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून येथील तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी (ता. ११) सकाळी १० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन केल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.
नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी तालुकास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन राबविण्यात यावा, अशा सप्टेंबर २०१२ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना दिल्या आहेत. या दिवशी सार्वजनिक सुटी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल. त्याप्रमाणे तालुकास्तरावर येथील तहसीलदार कार्यालय शुक्रवारी (ता. ११) लोकशाही दिन साजरा करणार आहे. हा लोकशाही दिन दरमहा सकाळी १० वाजता तहसीलदार कार्यालयात होईल. लोकशाही दिनाकरिता तक्रार अर्ज करावयाचा असल्यास आवश्यक नमुन्यात १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी लोकशाही दिनात अर्ज करता येईल. जिल्हाधिकारी लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल. चारही स्तरांवरील लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व किंवा अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले-देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर अर्ज लोकशाही दिनाकरिता स्‍वीकृत करता येणार नाहीत. लोकशाही दिनात अर्ज स्‍वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभागाध्ये विभागप्रमुखांकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येईल. संबंधित विभागप्रमुख अर्जातील विनंतीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह लोकशाही दिनी हजर राहतील. अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी आदी बाबींचा विचार करून लोकशाही दिन प्रमुख योग्य निर्णय देतील. तसेच जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्‍वीकृत करता येऊ शकणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी ८ दिवसांत पाठविण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकित करण्यात येईल. अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनी अथवा त्यादिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देण्यात येईल, असे कळविले आहे.
....................
...तर अर्ज सादर करता येणार नाही
लोकशाही दिन तहसीलदार कार्यालयात होईल त्यावेळी मूळ अर्जासह संबंधिताने उपस्थित राहावे. विहित नमुन्यात अर्ज त्यासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. सर्व बाबींची पूर्तता केली नाही, तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही, असेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com