

खांबाळेत उद्यापासून
अखंड हरिनाम सप्ताह
वैभववाडी ः खांबाळे साळुंखेवाडी येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरात रविवारी (ता.६) पासून अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने राज्यभरातील किर्तनकारांचे कीर्तन आणि प्रवचन ऐकण्याची संधी भाविकांना उपलब्ध होणार आहे. ६ ते १२ एप्रिल दरम्यान हा सप्ताह होणार आहे. पहाटे ५ ते ७ प्रातस्मरण काकड आरती, ८ ते १२ आणि सायकांळी ३ ते ५ श्री. ज्ञानेश्वरीचे सामुदायीक पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ७ ते ७.३० व रात्री ९ ते ११ कीर्तन असे कार्यक्रम होतील. मुकुंद महाराज पाटेकर (मुंबई), कृष्णांत महाराज कुंभार (कोल्हापुर), संतोष महाराज राठोड (मुंबई), श्रीराम महाराज पांचाळ (राजापुर), शंकर महाराज मोरे (वाई सातारा), ज्ञानेश्वरी पौळ (वय-७, संभाजीनगर), आशाताई हनमघर (पुणे), भक्तीयोगी कृष्णानंद महाराज (साळुंखे) यांची किर्तने होतील. या सप्ताहाची सांगता १२ एप्रिलला श्री. ज्ञानेश्वर महाराजाच्या ग्रंथ दिंडीने होणार आहे.
-------
जिल्हा पदोन्नती
समिती सभेत चर्चा
सिंधुदुर्गनगरी ः मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पदोन्नती समितीची सभा झाली. यात जिल्हा परिषदेच्या विभागनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती व सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायत विभाग ५, बांधकाम विभाग २, आरोग्य विभाग ६ असे एकूण १३ पदोन्नतीचे प्रस्ताव सादर केले होते. तसेच सामान्य प्रशासन विभाग ८२, ग्रामपंचायत विभाग ९३, शिक्षण प्राथमिक विभाग १५३, बांधकाम विभाग ६ असे एकूण ३३४ विभागनिहाय सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव सादर केले. या सभेत प्राप्त प्रस्तावाचे वाचन करण्यात आले आणि प्रत्येक प्रस्तावाची छाननी करुन योग्य प्रस्तवाना मान्यता देण्यात आली, असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) किशोर काळे यांनी दिली आहे.
-----
राज्य सामाईक प्रवेश
परीक्षा बुधवारपासून
सिंधुदुर्गनगरी ः शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र बी, प्लानिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी २०२५ ही परीक्षा (पीसीबी ग्रुप) ९ ते १७ एप्रिल ( १० व १४ एप्रिल वगळून) व (पीसीएम ग्रुप) १९ ते २७ एप्रिल (२४ एप्रिल वगळून) सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली, हरकुळ बु. व जेबीएफस मेट्रोपोलीटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट (एमआयटीएम) सुकळवाड (ता. मालवण) या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
-------------------
लोकशाही दिनाचे
सोमवारी आयोजन
सिंधुदुर्गनगरी ः एप्रिल महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिल्या सोमवारी (ता.७) दुपारी १ ते ३ या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.