

हळवल मंदिरात
उद्या रामनवमी
कणकवली ः हळवल येथील श्रीराम मंदिरात रविवारी (ता.६) श्रीराम नवमी उत्सव सोहळा होणार आहे. रविवारी सकाळी साडेआठला श्रीराम षोडशोपचार पूजा, सकाळी नऊला उत्सवाचे ग्रामदेवतेला आमंत्रण, सकाळी दहाला श्रीराम जन्माचे कीर्तन - नामदेव पांडुरंग महाराज, दुपारी बाराला श्रीराम जन्म सोहळा दर्शन आणि तीर्थप्रसाद, दुपारी एकला श्रीराम पालखीची प्रदक्षिणा, दुपारी दीडला महाप्रसाद, सायंकाळी सहाला वारकरी आणि बाल गोपाळांचा हरिपाठ, रात्री आठला श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, हळवल यांचे भजन, रात्री नऊला श्रीराम पालखीची प्रदक्षिणा, रात्री अकराला कीर्तन, रात्री बाराला दशावतारी नाटक श्री शिवराई रवळनाथ नाट्यमंडळ, हळवल हे सादर करतील. ७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव समाप्ती व महाप्रसाद कार्यक्रम दुपारी एकला होईल. श्रीराम मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उद्या (ता.५) होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.