चिपळूणमधील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे स्थलांतर

चिपळूणमधील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे स्थलांतर
Published on

-ratchl३२.jpg-
२५N५५५५३
चिपळूण ः शहरातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेची इमारत.
------
विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे स्थलांतर
शासनाचा निर्णय ; ठाणे, पालघर, रायगडमध्ये सर्वाधिक पशुधन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : पशुधनाच्या आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी १९७७ पासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील ६ जिल्ह्यांसाठी चिपळूण येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या विभागीय रोग आरे कॉलनीत स्थलांतर होणार आहे. गेल्या २ वर्षांपासून याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीवर बुधवारी शासन निर्णयाने शिक्कामोर्तब झाले. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन असल्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असून आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला लगतच्या कोल्हापूरच्या प्रयोगशाळेशी जोडण्यात आले आहे.
पशुधनाच्या आजाराचे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार व्हावेत, पशुधनामध्ये येणाऱ्या साथीच्या रोगाची लक्षणे विचारात घेऊन या रोगाचे रोग निदान करुन रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात ८ विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी पुणे विभागात पुणे व कोल्हापूर अशा २ प्रयोगशाळा कार्यान्वित असून उर्वरित ६ प्रयोगशाळा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, नागपूर व चिपळूण येथे कार्यरत आहेत. कृषी व सहकार विभागाच्या शासन निर्णयानुसार १० ऑक्टोबर १९७४ रोजी चिपळूण शहरातील मार्कंडी येथे कोकण विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली. ही प्रयोगशाळा १ एप्रिल १९७० पासून प्रत्यक्षात कार्यान्वित झाली.
येथील प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्तांसह पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहक, परिचर अशी एकूण ११ पदे मंजूर आहेत. मात्र अलिकडच्या काळात ही सर्व पदे रिक्त आहेत. २ वर्षांपासून परिचरही भरला गेलेला नाही. त्यामुळे सध्यस्थितीत ही प्रयोगशाळा फक्त नावापुरती राहिली होती.
जिल्हा पशुसंवर्धन सर्व चिकित्सालयाच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे येथील सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. सद्यस्थितीत ही प्रयोगशाळा येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या इमारतीमध्ये कार्यान्वित असून या प्रयोगशाळेच्या कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग या कोकणातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
२०२३ पासून या प्रयोगशाळेच्या स्थलांतरावर चर्चा सुरू झाली. त्यानुसार पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यातील पशुधनाची संख्या व गुण नियंत्रण प्रयोगशाळेचे गोरेगाव, मुंबई येथे उपलब्ध इमारत ही बाब विचारात घेवून चिपळूणच्या प्रयोगशाळेचे मंजूर पदांसह स्थलांतरण उपायुक्त पशुसंवर्धन, गुण नियंत्रण प्रयोगशाळा, आरे कॉलनी, गोरेगांव (पूर्व), मुंबई या संस्थेच्या इमारतीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com