रत्नागिरीत ३० हजार, तर चिपळुणात १७ हजार नोंदणी

रत्नागिरीत ३० हजार, तर चिपळुणात १७ हजार नोंदणी
Published on

- rat४p२९.jpg-
२५N५५५१६
चिपळूण ः पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाध्यक्ष राजेश सावंत.
---------
भाजप सदस्य नोंदणीला जिल्ह्यात प्रतिसाद
राजेश सावंत ः रत्नागिरीत ३० तर चिपळुणात १७ हजार नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः भाजपने राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यातही भाजपने चांगल्या प्रकारे सदस्य नोंदणी मोहीम राबवली होती. त्यानुसार रत्नागिरी विधानसभा मतदार संघात ३० हजार, चिपळूणमध्ये १७ हजार तर राजापूरमध्ये १६ हजार सदस्य नोंदणी झाली आहे. भाजपच्या सदस्य नोंदणीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली.
चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी शहरातील शिक्षकभवन येथे झाली. या बैठकीपूर्वी भाजपच्या वर्धापनदिननिमित्ताने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांवर चर्चा झाली. सावंत म्हणाले, जिल्ह्यात रविवारी (ता. ६) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही हे उपक्रम राबवले जाणार आहेत. भाजपच्या वर्धापनदिनानिमित्ताने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते घरघरांत ध्वजारोहण करून हा दिवस साजरा करणार आहेत. या दिवशी भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानदेखील केला जाणार आहे. रामनवमीनिमित्त विविध मंदिरात लाडूवाटपही करण्यात येणार आहे. या वेळी जिल्हा सचिव अमित केतकर, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, शहराध्यक्ष राम शिंदे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-----
खासदार राणेंच्या वाढदिनी कार्यक्रम
कोकणचे नेते व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ एप्रिलला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. देवरूख येथील मराठा भवनमध्ये राणे शुभेच्छा स्वीकारणार आहेत. याच दिवशी संगमेश्वरात बैलगाडा स्पर्धेचेही आयोजन केले आहे, असे सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com