

नाणीज क्षेत्री उद्या श्रीराम नवमी उत्सव
नरेंद्राचार्य महाराज संस्थान ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ४ : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे श्रीक्षेत्री रविवारी (ता. ६) श्रीराम नवमी वारी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाणीज येथे होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात उद्यापासून होईल. नैमित्तिक धार्मिक विधीनंतर महामृत्युंजय सप्तचिरंजीव याग सुरू होईल. सुंदरगड व नाथांचे माहेर येथील देवदेवतांना श्रीराम नवमी सोहळ्याची निमंत्रणे देण्यात येणार आहेत. वाद्यांच्या गजरात, मिरवणुकांनी ही निमंत्रणे देण्यात येतील. नाथांचे माहेर येथील मंदिराचे यजमानपद वसई जिल्हा सेवा समितीकडे आहे. वरद चिंतामणी मंदिराचे यजमानपद नवी मुंबई सेवा समितीकडे आहे. भगवान प्रभू श्रीराम मंदिराचे यजमानपद पुणे जिल्हा सेवा समितीकडे आहे, तर मुख्य मंदिर संतशिरोमणी गजानन महाराज मंदिराचे यजमानपद नागपूर जिल्हा सेवासमितीकडे आहे. सुंदरगडावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या सुंदर मूर्ती असलेले श्रीराम मंदिर आहे. या सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिरासह सुंदरगडावरील सर्वच मंदिरे सुशोभित केली आहेत. रविवारी (ता. ६) मुख्य सोहळा होईल. ११.३० ते १ या काळात श्रीराम जन्मोत्सव आहे. त्यात मोठ्याप्रमाणात भाविक सहभागी होणार आहेत. यावेळी श्रीरामाची गाणी, पाळणा म्हटला जाईल. सर्व भाविकांसाठी चोविस तास महाप्रसाद असेल. रात्री ७.३० ते ८.३० कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर सर्वांचे आकर्षण असलेले जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर देवाला साकडे घालून वारी उत्सवाची सांगता होईल. दरम्यान, या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून दोन दिवस मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटलमध्ये नामवंत डॉक्टर तपासणी व उपचार करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.