अपमानास्पद वागणुकीची आशा स्वयंसेविकांची तक्रार

अपमानास्पद वागणुकीची आशा स्वयंसेविकांची तक्रार
Published on

‘त्या’ अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक
आशा स्वयंसेविकांचे निवेदन ; अन्यथा कामबंद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.४ ः एका अधिकारी आशा स्वयंसेविकांना अपमानास्पद वागणुक देण्यात आल्याची निवेदनाद्वारे तक्रार तालुक्यातील आशा स्वयंसेवकांनी काल (ता. ३) तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्याकडे सादर केली.
या निवेदनात म्हटले आहे की, एका अधिकाऱ्याने पेवेतील आशांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. ‘त्या’ अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी. याबाबत कार्यवाही न झाल्यास मंडणगड तालुक्यातील सर्व आशा स्वंयसेविका कामबंद आंदोलन करणार आहेत. तसेच त्यांची तत्काळ तालुक्याच्या बाहेर बदली न झाल्यास आशा स्वंयसेविका कामावर हजर होणार नाहीत, याबाबत योग्य तो न्याय मिळावा. या विषयासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित गावंडे यांनी माध्यमांना या विषयासंदर्भात तक्रारदार आशा स्वंयसेविका यांचे म्हणणे व बाजू मी ऐकून घेतली असल्याचे सांगितले. तसेच ज्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी तालुका आरोग्य विभागाकडून पत्र काढण्यात आले आहे. तो खुलासा प्राप्त झाल्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा लेखी स्वयंस्पष्ट अहवाल वरिष्ठ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने रितसर कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
----
तक्रारीकडे तालुक्याचे लक्ष
वार्षिक लेखापरिक्षणाच्या निमित्ताने ३ एप्रिल रोजी तालुक्यातील दीडशेहून अधिक आशा स्वंयसेविका भिंगळोली येथे आलेल्या असताना तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर या प्रश्नावर मोठा गदारोळ झाला. त्यामुळे काही काळ वातावरण गंभीर झाले. आता जिल्हा आरोग्य अधिकारी या प्रकरणात कोणती कारवाई करतात, याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com