सावंतवाडीतील ६३ ग्रामपंचायतींची मंगळवारी आरक्षण सोडत

सावंतवाडीतील ६३ ग्रामपंचायतींची मंगळवारी आरक्षण सोडत
Published on

सावंतवाडीतील ६३ ग्रामपंचायतींची मंगळवारी आरक्षण सोडत
सावंतवाडी, ता. ४ ः तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी (ता.८) सकाळी ११ वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहात होणार आहे. २०२५-३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आहे.
सावंतवाडी तालुक्यांमध्ये एकूण ६३ ग्रामपंचायती असून यापैकी अनुसूचित जाती करता ४, अनुसूचित जमाती ०, नागरिकांचा मागास प्रवर्ग १७, खुल्या प्रवर्गासाठी ४२, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला २, अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला ०, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ८, खुला प्रवर्ग महिला २१ ग्रामपंचायत असणार आहेत. एकूणच आरक्षणाच्या स्पष्टतेनंतर सरपंच पदासाठी शिक्षकांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. तालुक्यातील जवळपास बांदा, कोलगाव, तळवडे, मळेवाड, मळगाव आधी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा कालावधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com