आमदार नीलेश राणेंना टक्केवारीची गरज नाही

आमदार नीलेश राणेंना
टक्केवारीची गरज नाही
Published on

आमदार नीलेश राणेंना
टक्केवारीची गरज नाही

राजा गावकर ः खोबरेकरांच्या टिकेला प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : आमदार नीलेश राणे हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मतदारसंघातील कामांना निधी आणण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टक्केवारीची गरज नाही. कारण त्यांचे कार्यकर्ते हे सक्षम आहेत अशी टीका शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी केली आहे.
आमदार राणे यांचा पाहणी दौरा हा कार्यकर्त्यांच्या टक्केवारी वाढवण्यासाठी असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला होता. या टीकेला श्री. गावकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘‘आमदार वैभव नाईक यांनी दहा वर्षांत मतदारसंघातील कामे मार्गी लावली असती तर त्यांचा विधानसभेत जनतेने पराभव केला नसता. सगळ्याच गोष्टी या पैशाने विकत घेता येत नाही. मात्र विद्यमान आमदार नीलेश राणे यांनी निवडून आल्यापासून आतापर्यंत मतदारसंघातील रखडलेल्या कामांसाठी तसेच अन्य कामे मार्गी लागावीत यासाठी निधी आणण्याचे काम केले आहे. जी कामे आहेत ती दर्जेदार व्हावीत यासाठीच आमदार राणे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांचा पाहणी दौरा हा टक्केवारी वाढविण्यासाठी असल्याचा खोबरेकर यांचा आरोप हास्यास्पद आहे. कारण आमदार राणे यांचे कार्यकर्ते हे सक्षम आहेत त्यांना टक्केवारीची गरज नाही हे खोबरेकर यांनी ध्यानात घ्यावे. दहा वर्षांत मतदारसंघातील जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा निर्धार आमदार राणे यांनी केला आहे. त्यामुळे मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ते जास्तीत जास्त निधी आणून ती कामे मार्गी लावतील तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आमदार राणे यांनी काय करावे आणि काय करू नये हे ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही असेही श्री. गावकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com