शिल्पकार राम सुतार यांचा आरवली सोनसुरेत सत्कार

शिल्पकार राम सुतार यांचा 
आरवली सोनसुरेत सत्कार
Published on

55580

शिल्पकार राम सुतार यांचा
आरवली सोनसुरेत सत्कार

वेंगुर्ले, ता. ४ : भव्यदिव्य पुतळ्यांच्या निर्मितीसाठी जगप्रसिद्ध असलेले आणि वयाची शंभरी पार केलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांनी वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोनसुरे येथील अनादी स्वयं ब्रह्मपुरी पुण्यभूमी सुवर्णक्षेत्राला भेट दिली. यावेळी सोनसुरे पीठाचे क्षेत्र अधिकारी शिवचैतन्य आजोबा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मालवण-राजकोट येथे सुरू असलेल्या शिवाजी महाराजांच्या ६० फुटी पुतळ्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ते मालवणला आले असता त्यांनी सोनसुरे येथील धार्मिक पीठाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे चिरंजीव अनिल सुतार, गोवा येथील बांधकाम व्यावसायिक त्रिविक्रम प्रभू गावकर, सोनसुरे पीठाचे अध्यक्ष अनंत मगर, विश्वस्त यदुनाथ चिपकर, संजय गडेकर, वाळू शिल्पकार रविराज चीपकर व दीपक गावडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेणी राम सुतार यांनी आपल्या बालपणापासूनच्या विविध आठवणींना उजाळा देत आपण कसा घडलो, याबाबत उपस्थितांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com