

-rat४p३४.jpg-
२५N५५५७०
रत्नागिरी ः हातखंबा येथे अवघड चढावावर बंद पडलेला ट्रक.
----
हातखंबा हायस्कूलजवळील चढाव धोकादायक
अवजड वाहने पडतात अडकून ; दुर्घटना घडण्याची भीती, उपायोजनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूलजवळील चढाव अवजड वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. अनेक वाहने तेथे अडकून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. कामाचा ठेका असलेल्या कंपनीने हा चढ तयार केला आहे. त्यामुळे हा भाग अपघातासाठी डेंजर झोन बनला आहे. वाहने अडकून पडत असल्याने वाहतूककोंडीसह वाहनचालकांना तो डोकेदुखी ठरत आहे.
महामार्गावरील हातखंबा भागातील कामाला गती मिळाली असली तरी मोठ्या समस्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. हातखंबा तिठ्यापासून हातखंबा वाहतूक पोलिस मदत केंद्रापर्यंत अपघाताचे चार डेंजर स्पॉट आहेत. चारही ठिकाणी छोटे-मोठे अपघाताच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या भागात हातखंबा (तिठा) ते हायस्कूलपर्यंत काँक्रिटची मार्गिका तुकड्यात तयार करण्यात आली आहे. यावरून वाहतूक सुरू आहे. हायस्कूल येथे काँक्रिटीकरण केलेली मार्गिका समाप्त होते त्या ठिकाणाहून काँक्रिटच्या मार्गिकेला डांबरीकरणाचा रस्ता जोडण्यात आला आहे. मात्र जोडरस्ता तयार करत असताना महामार्ग ठेकेदार कंपनीने चढणीचा रस्ता आणि अवघड वळण लक्षात घेणे आवश्यक होते; मात्र त्याकडे दुर्लक्षित करून आपले काम सुलभ करून वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे.
तसेच येथील जुना डांबरीकरणाचा रस्ता बंद केल्याने तो कालबाह्य होत आहे. अडकलेल्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने काँक्रिटीकरणाच्या मार्गिकेवर येण्यासाठी अवघड चढाव आणि वळणाचा रस्ता चढून यावे लागत आहे. परंतु हा चढाव एवढा धोकादायक आहे की अवजड वाहनांचे एक्सेल तुटणे, क्लज सेटिंगमध्ये बिघाड, चढाव न चढणे, अशा विविध समस्या वाहनचालकांना येत आहेत. एखादे अवजड वाहन येथे अचानक बंद पडल्यास ब्रेक निकामी होऊन मागून येणाऱ्या गाड्यांना धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकडे महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नव्या आराखड्यानुसार हातखंबा ब्रीजजवळील वळण, दर्ग्याजवळील अवघड वळण हे काढून थेट सरळ रेषेत मार्ग तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग हातखंबा हायस्कूल ते दर्ग्याजवळून असणार आहे. यामध्ये ब्रीज निर्माण करण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. नवा मार्ग पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत निर्माण झालेला हा धोकादायक स्पॉट काढण्याची गरज आहे, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पुढील कॉंक्रिटच्या रस्त्याला जोडण्यासाठी तयार करण्यात आलेला रस्ता कच्चा आहे. तो दुरुस्त करण्याची गरज असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.