

घुमडाई मंदिरात
उद्या रामनवमी
मालवण : घुमडे (ता.मालवण) येथील श्रीदेवी घुमडाई मंदिरात रविवारी (ता.६) रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी आठ वाजता धार्मिक कार्यक्रम, साडेदहा वाजता स्थानिकांची भजने, बारा वाजता राम जन्म सोहळा, साडेबाराला पालखी सोहळा, एक वाजता महाप्रसाद, सायंकाळी साडेदहाला वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा गरुड गर्वहरण हा नाट्यप्रयोग होणार आहे, तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ आणि मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांनी केले आहे.
-------------------
ओटवणेत उद्या
विविध कार्यक्रम
ओटवणे ः कोलगाव नाईकबाग मित्रमंडळातर्फे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रविवारी (ता.६) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत, चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ (चेंदवण) यांचा ‘सुवासिनीची सत्वपरीक्षा’ नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन कोलगाव नाईकबाग मित्रमंडळाने केले आहे.
---
विद्यार्थ्यांसाठी
‘भेरा’ दाखवणार
बांदा ः माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाच्या मदतीसाठी मंगळवारी (ता.८) सायंकाळी ६.३० वाजता पारिजात मंगल कार्यालय कोंडूरा तिठा (आरोस - दांडेली) येथे जर्मनी, फ्रान्स, चेन्नई, मुंबई, पुणे येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या पहिल्या मालवणी ‘भेरा’ चित्रपटाचे आयोजन केले आहे. याचे प्रवेशमूल्य ऐच्छिक असून, माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय, मदतीसाठीच्या या खास शोसाठी सर्वांनी उपस्थित राहून हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.