

55602
पोल्ट्रीत अडकलेल्या बिबट्याची सुटका
तिथवलीतील प्रकार; नैसर्गिक अधिवासात सोडले
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ४ ः तिथवली येथील गुफरान निजाम काझी यांच्या पोल्ट्री शेडमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुटका केली. हा प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.
तिथवली येथील श्री. काझी यांचे गावातच कुक्कटपालन शेड आहे. या शेडला पाच ते सहा फुटांपर्यंत लोखंडी जाळी असून त्यावर शेडनेट बसविलेली आहे. आज पहाटे सहाच्या सुमारास श्री. काझी हे नेहमीप्रमाणे कुक्कुटपालन शेडकडे गेले असता त्यांना शेडमध्ये बिबट्या दिसून आला. मात्र, त्याला शेडमधून बाहेर पडता येत नव्हते. ही माहिती त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनपाल हरी लाड यांच्यासह सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेडच्या दरवाजानजीक सापळा लावला. काही वेळानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
------------
कोट
तिथवली येथे अडकलेल्या बिबट्यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर आमचे पथक घटनास्थळी पिंजरा घेऊन पोहोचले. बिबट्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले. काही लोकांकडून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे.
- हरी लाड, वनपाल, वैभववाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.