‘बीटीएस’ परीक्षेमध्ये वरदा जिल्ह्यात प्रथम

‘बीटीएस’ परीक्षेमध्ये 
वरदा जिल्ह्यात प्रथम
Published on: 

55723

‘बीटीएस’ परीक्षेमध्ये
वरदा जिल्ह्यात प्रथम

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ५ ः अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची सातवीतील विद्यार्थिनी वरदा सामंत हिने भारत टॅलेंट सर्च (बीटीएस) या राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले.
एज्युकेटेड अॅकॅडमी आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ ही नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘एफएलएन’ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व अपेक्षित अध्ययन कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून या परीक्षेचे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा म्हणून आयोजन केले जाते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत वरदा हिने विशेष प्रावीण्यासह राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत २२ वा, जिल्ह्यात प्रथम व सावंतवाडी केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे. यानिमित्त वरदा हिचा अरुणा सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा रेश्मा परुळेकर, वासदेव सामंत उपस्थित होते. या उल्लेखनीय यशाबद्दल वरदा, तिचे पालक व मार्गदर्शक शिक्षिका तेजश्री सावंत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com