

चिपळुणातील दोन धनगरवाड्यात टँकर
प्रशासनाची पाहणी ; ११ गावातून टॅंकरची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः तालुक्यातील पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसणाऱ्या धनगरवाड्यांना अखेर प्रशासनाने बुधवारपासून टँकर सुरू केला आहे. अडरे व टेरव या दोन गावांतील तहानलेल्या धनगरवाड्यांसाठी पहिल्यांदा टँकर धावला आहे. उर्वरित धनगरवाड्यांसह गाववाड्यांना अद्याप टँकरची प्रतीक्षा आहे.
तालुका प्रशासनाने टँकर सुरू करावा यासाठी कादवड, सावर्डे, आनारी, अडरे गावांतील धनगरवाड्यांतून सातत्याने मागणी केली जात आहे. यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून संयुक्तरित्या पाहणी केल्यानंतर अखेर बुधवारी अडरे व टेरव या दोन गावांतील धनगरवाड्यांसाठी टँकर धावला. आतापर्यंत ११ गावांतील वाड्यांमधून पाणी टँकरसाठीचे अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत समितीने केवळ एका टँकर अधिगृहित केला. यामुळे उर्वरित वाड्यावस्त्यांना पाणी टँकर सुरू करायचे झाल्यास एका टँकरद्वारे टंचाईग्रस्तांची तहान भागवताना प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.