संक्षिप्त-रेवंडी-तांडलवाडीत १२ मेस डान्स स्पर्धा
दोन ट्रक बंद पडल्याने
कळणेत वाहतूक ठप्प
दोडामार्ग ः कळणे येथील एका अवघड वळणावर मालवाहू ट्रक रस्त्याच्या मध्यभागी बंद पडल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र, रस्त्याच्या दुसर्या बाजूने दुसरा येणारा ट्रकही बंद पडल्याने दोन्ही बाजूची वाहने ठप्प झाली. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्ग-बांदा मार्गावरून दोडामार्गच्या दिशेने येणारा मालवाहू ट्रक कळणे येथील एका अवघड वळणावर रस्त्याच्या मध्यभागी बंद पडला. रस्त्याच्या साईडपट्टीवरून बंद पडलेल्या ट्रकला बाजू घेऊन जाणारा दुसरा मालवाहू टेम्पो त्या ट्रकच्या बाजूला जाऊन बंद पडला. त्यामुळे दोन्ही बाजूची सर्व वाहतूक बंद झाली होती. स्थानिक ग्रामस्थ व ट्रक चालक यांनी गटारात माती टाकून पुन्हा एकेरी वाहतूक सुरू केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडल्यामुळे कामानिमित्त जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.
--
रेवंडी-तांडलवाडीत
मेमध्ये डान्स स्पर्धा
मालवण ः रेवंडी-तांडेलवाडी येथील कुलस्वामी मंदिरात सत्यनारायण महापूजेनिमित्त १२ मेस रात्री १० वाजता जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आहे. प्रथम ११,१११, द्वितीय ७७७७, तृतीय ५५५५, उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी ११११ रु. व चषक देण्यात येणार आहे. अधीक माहितीसाठी विराज तळाशिलकर यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.