

धामणवणे शाळेचा
अमृत महोत्सव
चिपळूण : धामणवणे गावातील प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम १ मे रोजी होत आहे. ७५ वर्षांपूर्वी गावातील दूरदृष्टी असलेल्या सन्माननीय व्यक्तींनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुंबई व गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी यासाठी मोलाचे योगदान दिले. अशा सर्वांचे स्मरण करणे आणि ७५ वर्षाचा मागोवा घेण्याच्यादृष्टीने अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
---
गावतळे कॉलेजची
पथक तपासणी
गावतळे ः दापोली तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल येथे शाळा सिद्धी मुल्यांकन व प्रमाणीकरण अंतर्गत विद्यासमितीच्या पथकाने तपासणी केली. राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूलचे प्राचार्य बी. जे. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व समिती सदस्य प्रा. दीपक पंडित, प्रा. एन. एम. साळोखे, प्रा. आर. ए. परीट यांच्या समितीने पाहणी करून मार्गदर्शन केले. समितीने शाळेला बी ग्रेड देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.