

-rat२५p२१.jpg -
P२५N५९८०२
राजापूर ः अक्षय तरळ याला गौरवताना मान्यवर.
----
अक्षय तरळला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ः तालुक्यातील तिवरेचे सुपुत्र अक्षय तरळ याला मल्लखांब या खेळासाठी क्रीडाक्षेत्रातील मानाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा खेळाडू’ हा पुरस्कार शासनातर्फे देऊन गौरवण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन्, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत अक्षयला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे बालेवाडी येथे झाला. मे २०२३ मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत अक्षयने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना पाच सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक अशी सहा पदके पटकावून जागतिक मल्लखांबपट्टू हा किताब मिळवला. तसेच २०२३ मध्ये झालेल्या ३७ व्या नॅशनल गेम्स (गोवा) या स्पर्धेत तीन सुवर्णपदक आणि ३६व्या नॅशनल गेम्स या स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक मिळवले. आपल्या यशामध्ये आई-वडील यांच्यासह गुरू गणेश देवरूखकर व महेश अटाळे यांचा मोलाचा वाटा राहिल्याचे त्याने सांगत त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. पुरस्कार वितरणाला व्यायामशाळेचे अध्यक्ष आमदार पराग अळवणी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.