चिपळुणात कॉंग्रेसकडून पहलगाममधील घटनेचा निषेध

चिपळुणात कॉंग्रेसकडून पहलगाममधील घटनेचा निषेध
Published on

काँग्रेसकडून पहलगाममधील घटनेचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा चिपळूण तालुका काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आला असून, सरकारने या विरोधात जशास तसे उत्तर देऊन दहशतवाद्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन काँग्रेसच्यावतीने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना देण्यात आले.
या भ्याड हल्ल्याचे पडसाद चिपळुणात उमटले आहेत. याचा चिपळूण तालुका काँग्रेसने तीव्र निषेध केला असून, प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह, सेवादल जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार, माजी नगरसेवक कबीर काद्री, शहराध्यक्ष संतोष सावंत देसाई, तालुका उपाध्यक्ष सुबोध सावंतदेसाई, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र भुरण, दादा आखाडे, सुनील खेडेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com