

60014
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे
नीलेश राणे : कुडाळ येथे खरीप हंगाम नियोजन बैठक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधारावे, यामध्ये मला रस आहे. कृषी विभागाचा प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय पाहिजे, ते विचारले पाहिजे. आमचा शेतकरी तुमच्याजवळ येणार नाही; पण तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता आणि त्याचे अर्थकारण बदलू शकता, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी येथे केले.
येथे आयोजित केलेल्या कृषी विभागाच्या खरीप हंगाम तालुकास्तरीय पूर्वतयारी नियोजन बैठकीत आमदार राणे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. कुडाळ व मालवण तालुक्यांतील कृषी विभागातर्फे खरीप हंगाम तालुकास्तरीय पूर्वतयारी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी दोन्ही तालुक्यांतील शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्कार आमदार राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सावंतवाडी उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम, कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, कुडाळ तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले, मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, तालुका प्रमुख अरविंद करलकर उपस्थित होते. या बैठकीमध्ये दोन्ही तालुक्यांच्या कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्याचा आढावा घेतला.
-----------
निधीसाठी निश्चितच प्रयत्न
आमदार राणे म्हणाले, ‘‘कोकणातील शेतकरी मागणारा नाही. मंत्रालयात जाऊन कृषिमंत्री, अर्थमंत्र्यांच्या दालनासमोर उभा राहणारा नाही. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर, त्यांच्या घरी जाऊन माहिती देऊन त्यांचे अर्थकारण बदलण्यासाठी प्रयत्न करा. केवळ प्रशिक्षणे देऊन चालणार नाही, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना योजनांचा लाभ दिला पाहिजे. सध्या कृषी विभागासाठी तरतूद नाही; पण सिंधुरत्न योजनेतून ज्या काही योजना सुरू आहेत, त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. पर्यायी निधीची व्यवस्था करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. या ठिकाणचा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, त्याचे अर्थकारण बदलले पाहिजे, याची जबाबदारी माझ्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. केवळ कागदावरील आकडे महत्त्वाचे नाहीत तर प्रत्यक्षात काय काम होते, ते महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची आर्थिक घडी आपण सुधारू शकतो, त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या दृष्टीने काम करावे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.