किंजवडे-ठाकूरवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

किंजवडे-ठाकूरवाडी शाळेत
शैक्षणिक साहित्य वाटप
Published on

60012

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन
यशस्वी व्हावे ः मेस्त्री

ठाकूरवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. २६ ः कोकण आधार प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक बांधिलकी जोपासण्याचे मोलाचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे. आई-वडील, शाळा आणि शिक्षकांना विसरू नका, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील मेस्त्री यांनी केले.
किंजवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकूरवाडीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी कोकण आधार प्रतिष्ठान (दिवा ठाणे) संस्थेचे संस्थापक श्री. मेस्त्री, अध्यक्ष वैभव जाधव, सेक्रेटरी प्रशांत अनुभवणे, खजिनदार वसंत ठोंबरे, उपाध्यक्ष विजय गुरव, सल्लागार उमेश घोगळे, प्रशांत अपकर, राजेश परब, नरेश गोमले, नितीन जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप परब, ज्येष्ठ मार्गदर्शक उदय तळवडेकर, महिला बचत गट अध्यक्ष उर्मिला तळवडेकर, किंजवडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष पालवे, मुख्याध्यापक गोविंदराव जाधव, सहशिक्षक महेश इंगोले आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक गोविंदराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. महेश इंगोले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com