

60013
किंजवडे ग्रामपंचायतीचा
सिंधुदुर्गनगरी येथे सन्मान
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. २५ ः माझी वसुंधरा अभियान ४.० व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम व कोकण विभागात द्वितीय क्रमांक तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२३-२४ मध्ये जिल्हा स्तरावर यश मिळविलेल्या किंजवडे ग्रामपंचायतीला सिंधुदुर्गनगरी येथील कार्यक्रमात गौरविण्यात आले.
राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (ता. २४) छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद सिंधुदुर्गनगरी येथे पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना पारितोषिके वितरित करण्यात आली. किंजवडेचे सरपंच संतोष किंजवडेकर आणि ग्रामपंचायत अधिकारी शिवराज राठोड यांनी सीईओ रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. त्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते. किंजवडे ग्रामपंचायतीने मिळविलेल्या या यशाबद्दल सरपंच किंजवडेकर यांनी समाधान व्यक्त करून सर्व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.