

*फक्त रत्नागिरी आवृत्तीसाठी
------------------
KOP२५N६००१६
रत्नागिरी ः येथील प्रदर्शनात मांडलेले कलाश्री उद्योग समूहाचा फोर इन वन बंब.
---
कोकण कृषी औद्योगिक प्रदर्शनात
‘कलाश्री’चा बंब ठरतोय लक्षवेधी
रत्नागिरी, ता. २६ ः येथील पटवर्धन हायस्कूलच्या पटांगणावर सुरू असलेल्या कृषी, औद्योगिक कन्झुमर शॉपी व फुड फेस्टीव्हल महोत्सवात उद्यमबाग-बेळगाव येथील कलाश्री बंब ॲण्ड स्टील फर्निचर या उद्योग समूहाने तयार केलेले फोर इन वन बंब हे उत्पादन लक्षवेधी ठरत आहे. ही बंब यंत्रणा अनेक लोकांच्या पसंतीला उतरली आहे.
या बंबामध्ये सौरऊर्जा, जळण, विद्युत व गॅस या चारही बाबींचा वापर करून पाणी गरम करता येते. हा बंब घर, सोसायटी, हॉटेल, होस्टेल, अपार्टमेंटमध्ये सहज वापरता येतो. अगदी ३५ लिटरपासून २००० लिटरपर्यंत पाणी गरम करता येते. यामध्ये माईल्ड स्टील व स्टेनलेस स्टील वापरले असून ही यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित, पर्यावरणपूरक आहे. किंमतही अगदी माफक असल्याने प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांच्या पसंतीला हा बंब उतरला असल्याचे दिसून येत आहे. यासाठी रत्नागिरी, गणपतीपुळे व दापोली येथील डिलर्सचे सहकार्य लाभले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.