

कडवईत रिक्षा संघटनेचे विविध कार्यक्रम
संगमेश्वर, ता. २६ ः संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिली. या वेळी सत्यनारायण महापूजा, सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद, दुपारी बारा ते तीन महाप्रसाद, दोन ते सायंकाळी साडेपाचपर्यंत भजन, सहा ते रात्री साडेआठ हरिपाठ, दहा वाजता ''वेगळं व्हायचंय मला'' हे सामाजिक नाटक सादर होणार आहे. कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजितराव ताम्हणकर आदी उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.