

सवेणी-धनगरवाडीचा
टँकरसाठी अर्ज
खेड ः तालुक्यातील सवेणी-धनगरवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. टँकरच्या प्रतीक्षेत असलेल्या गाववाड्यांची संख्या पाच झाली असून, अजूनही केवळ दोन गावातील वाड्यांमध्येच पाण्याचा टॅंकर धावत आहे. वावे-ढेबेवाडी, कुळवंडी-शिंदेवाडी, चिरणी-धनगरवाडी, गुणदे-काळकाईवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे.
---
खेडमध्ये भटक्या
कुत्र्यांचे निर्बिजीकरण
खेड ः खेड पालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या ३३ दिवसात ३८७ कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण केल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत यांनी दिली. शहराजवळील भोस्ते, भरणे, रेल्वेस्थानक येथील परिसरातून भटकी कुत्री शहरात येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वावरणाऱ्या कुत्र्यांनाही पकडून त्यांचेही निर्बिजीकरण करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.