

-rat26p14.jpg
60024
माहू ः तुळशी घाटात प्रचंड धूळ उडत असल्याने प्रवास असुरक्षित ठरतो आहे.
-rat26p11.jpg ः
60056
तुळशी : सर्वांत आधी बांधकाम सुरू झालेल्या येथील पुलाचे काम आजही अर्धवट अवस्थेत आहे.
-rat26p12.jpg
60022
माहू ः अनेक ठिकाणी काम असे अर्धवट ठेवले आहे.
-rat26p13.jpg
60023
साईडपट्टीसाठी आणलेली माती तशीच ठेवण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.
अकरा वर्षांनंतरही महामार्गाचे काम अपूर्णच
आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्ग; डेडलाईनची यंदाही हुलकावणी, सिंगल लेन पूर्ण नाही
मंडणगड, ता. २६ ः संसद आदर्श ग्राम या योजनेच्या माध्यमातून २०१४ मध्ये मान्यता मिळालेल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे-लोणंद या एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे काम २०२५ चा पूर्वार्ध संपत आला तरी पूर्ण झालेले नाही. तालुक्याच्या हद्दीतील ३६ किलोमीटर इतक्या लांबीच्या अंतरातील कामाच्या सद्यःस्थितीचे अवलोकन करता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यंदा काम पूर्ण करण्याची केलेली घोषणा व काम वेळेत संपवण्याची डेडलाईन गाठणे ठेकेदारास कठीण झाले आहे. शहर परिसरातील २ कि.मी. इतक्या अंतरात रस्त्याच्या कोणत्याही प्रकारच्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही.
मंडणगड ते पाले परिसरात रस्त्यास अजूनही दुभाजक असून सिंगल लेनचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. शेनाळे ते म्हाप्रळ परिसरातही सिंगल लेनचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. तुळशी व शेनाळे घाट परिसरातील अडचणींच्या कामास अद्याप सुरुवात नाही. पाचरळ, तुळशी येथे नव्याने तयार केलेला रस्ता खचला आहे. तुळशी-चिंचाळी या ठिकाणी पुलाचे काम अर्धवट आहे. मंडणगड शहर, भिंगळोली व पाचरळ येथे रस्त्याच्या कामामुळे घरे, दुकाने विस्थापित होणार आहेत. त्याबद्दल प्राधिकरणाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. घाटांच्या परिसरात रस्ता विस्तारीकरणासाठी डोंगराकडील बाजूस उभे ‘कटींग’ करण्यात आल्याने पावसाच्या कालावधीत थोडासा पाऊस पडला तरी दरड कोसळून रस्ता बंद होतो. गतवर्षी तुळशी घाटात १७ वेळा दरड कोसळल्याने ती साफ करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्यासाठी महसूल विभागाची दमछाक झाली होती. महामार्गाच्या एकंदरीत कामाची परिस्थिती पाहता काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता मावळली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनेक पुलांची कामे अर्धवट आहेत, तर काही ठिकाणी रस्ताही काँक्रिटीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.