-रिक्त पदांसह उपचार सामग्रीचा अभाव

-रिक्त पदांसह उपचार सामग्रीचा अभाव
Published on

-Rat२६p६.jpg
P२५N६०००६
ःमंडणगड ः पणदेरी व देव्हारे प्राथमिक आरोग्यकेंद्र.
---
रिक्त पदांसह उपचार सामग्रीचा अभाव
मंडणगड तालुका ; आरोग्य विभागात तब्बल चाळीस पदे रिक्त
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २६ ः अपुरे कर्मचारी, उपचार साधनसामग्रीचा अभाव या दोन कारणांमुळे मंडणगड तालुक्यातील नागरिकांना अत्यावश्यक आरोग्यसेवा तालुक्यात मिळण्यास गैरसोय आणि अडचणी येत आहेत तसेच तब्बल चाळीस रिक्त पदांमुळे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास विविध शासकीय योजनाची अंमलबजावणी व संदर्भित आरोग्यसेवा पुरवण्याकरिता मर्यादा येत आहेत.
या संदर्भात आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्यकेंद्रात एकूण चाळीस विविध प्रकारची पदे रिक्त आहेत. गेल्या तीन दशकात या कार्यालयाचा कारभार येनेकेने प्रकारे चालवा, असेच वरिष्ठांचे धोरण दिसून येत आहे. या संदर्भात तालुकावासियांकडून वेळोवेळी झालेल्या मागण्या व तक्रारीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची एकूण पाच पदे रिक्त आहेत. यात देव्हारे आरोग्यकेद्रांतील दोन्ही पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यक महिला पंदेरी व कुंबळे येथील प्रत्येक एक पद अशी दोन पदे रिक्त आहेत. मिश्रकचे कुंबळे येथील एक पद रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाची पंदेरी व कुंबळे येथील प्रत्येक एक पद अशी दोन पदे रिक्त आहेत. कुष्ठरोग तंत्रज्ञ पंदेरी येथील एक मंजूर पद रिक्त आहे. आरोग्यसेवक पुरुष कुंबळे येथे एक तर देव्हारे येथे दोन अशी तीन पदे रिक्त आहेत. आरोग्यसेवक महिला यांची पंदेरी येथे तीन, कुंबळे येथे तीन व देव्हारे येथे एक अशी सात पदे रिक्त आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी यांची पंदेरी व कुंबळे येथे प्रत्येकी एक पद अशी दोन पदे रिक्त आहेत. परिचर पुरुष यांची कुंबळे, पंदेरी व देव्हारे येथे प्रत्येकी दोन अशी सहा पदे रिक्त आहेत. परिचर महिलांची पंदेरी व कुंबळे येथे प्रत्येकी एक अशी दोन पदे रिक्त आहेत. सफाई कामगार कुंबळे, देव्हारे व पंदेरी येथे प्रत्येकी एक अशी तीन पदे रिक्त आहेत. अंशकालीन स्त्री परिचर पंदेरी व कुंबळे येथे प्रत्येकी एक अशी दोन पदे रिक्त आहेत. आशा स्वयंसेविकांची कुंबळे व पंदेरी येथे प्रत्येक एक अशी दोन पदे रिक्त आहेत.
--
तपासणी यंत्रसामुग्री नाही
बदलत्या काळातील आजारांचा विचार करता सोनोग्राफी, एक्स-रे, सीटीस्कॅन व डायलिसिस यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रुग्णांना या संदर्भातील उपचार व वैद्यकीय सेवांच्या उपचारासाठी तालुक्याच्या बाहेर जावे लागत आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून साथीच्या आजारांसह विविध आरोग्यसेवा पुरवल्या जातात. सद्यःस्थितीत अपुरे कर्मचारी व तांत्रिक साधनांच्या अभावामुळे अडचणी येत असल्याने कर्मचारी व साधने उपलब्ध करून देण्याची मागणी तालुक्यातून करण्यात येत आहे.

---- बातमीदार - सचिन माळी....२६.४.२०२५------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com