चिंदरवासीयांचे गुरुवारी उपोषण

चिंदरवासीयांचे 
गुरुवारी उपोषण
Published on

चिंदरवासीयांचे
गुरुवारी उपोषण
आचरा ः चिंदर-पालकरवाडी लब्देवाडी तेरई या २०१८-१९मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत या रस्त्यासाठी महाराष्ट्र दिनी १ मे रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे ६५ जणांचे स्वाक्षरी असलेले निवेदन तहसीलदार, आचरा पोलिस ठाणे व चिंदर ग्रामपंचायतीला दिले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत संबंधित विभागाशी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
...................
किल्ले सिंधुदुर्गवर
आज कलश रथयात्रा
मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक गड, किल्ले, नद्या यांच्या मातीच्या कलशाची महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. त्या कलश रथयात्रेची कोकण विभागाची सुरुवात राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांच्या उपस्थितीत येथील किल्ले सिंधुदुर्ग येथून उद्या (ता. २७) दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com