

60070
‘दहशतवाद्यांना गोळ्या घाला,
पाकिस्तानला समुद्रात बुडवा’
मालवणात पहलगाम हल्ल्याचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : येथील श्रमिक मच्छीमार संघटनेतर्फे जम्मू काश्मीरच्या पहलगाम बैसरन घाटीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दहशतवाद्यांच्या प्रतिकृती पायाखाली तुडवून आज निषेध व्यक्त करण्यात आला.
शहरातील दांडी किनारी सर्वांनी एकत्र येत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘अतिरेक्यांना गोळ्या घाला’, ‘पाकिस्तानला समुद्रात बुडवा’ अशा घोषणा दिल्या. तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी रश्मीन रोगे, सन्मेष परब, स्वप्नील घाडी, गणेश चव्हाण, श्रीराज बादेकर, भाई जाधव, महेश कोयंडे, विशाल आचरेकर, सुजित मोंडकर, वसंत गावकर, रणजित खवणेकर, योगेश पराडकर, प्रवीण कुबल, विठोबा केळुसकर, सुजित खवणेकर, बाबी जोगी, छोटू सावजी, रविकिरण तोरसकर तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.