

-rat२६p२१.jpg-
२५N६००९५
रत्नागिरी : जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा प्रारंभ करताना नरेंद्र घाणेकर व तनया घाणेकर.
----
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : सातव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरवात आज रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमी येथे झाली. (कै.) लीला फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्ह्यातील २५ वर्षे वयोगटातील खेळाडूंकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन फडके यांचे नातू नरेंद्र घाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी तनया घाणेकर, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी, आयोजक चैतन्य भिडे यांसह इतर बुद्धिबळप्रेमी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकूण सहा फेऱ्यांमध्ये स्विस लीग पद्धतीने बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेचे फिडे मानांकन असलेल्या जिल्ह्यातील नऊ बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
चिपळूणच्या श्रीहास नारकर याने पहिल्याच फेरीत तृतीय मानांकित सोहम रूमडे विरुद्ध अटीतटीच्या डावात विजय प्राप्त केला. दुसऱ्या फेरीत पाचव्या मानांकित यश गोगटे विरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला तर आर्या पळसुलेदेसाई हिने सहाव्या मानांकित वेद डोईफोडेला बरोबरीत रोखले. दोन फेऱ्यांअखेर प्रथम मानांकित आयुष मयेकर याच्यासह वरद पेठे, निधी मुळ्ये, साहस नारकर, सई प्रभुदेसाई, प्रणव मुळ्ये व अन्वय अंबिके प्रत्येकी दोन गुणांनीशी संयुक्तरित्या आघाडीवर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.