स्पर्धा परीक्षांसाठी सराव महत्त्वाचा

स्पर्धा परीक्षांसाठी सराव महत्त्वाचा

Published on

60511

स्पर्धा परीक्षांसाठी सराव महत्त्वाचा

डॉ. कमळकर ः कुडाळात विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानतर्फे गुणवंतांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः ‘‘स्पर्धा परीक्षेची गरज आणि त्यासाठी आवश्यक सराव महत्त्वाचा असतो. त्यासाठी विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानने हाती घेतलेले कार्य गौरवास्पद आहे. विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानची वाटचाल गौरवास्पद असून या ज्ञानरूपी रोपट्याच्या रूपांतर वटवृक्षात करा,’’ असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर केले. प्रतिष्ठानमधील सदस्य हे सर्व उपक्रमशील शिक्षक असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासामध्ये विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचे योगदान निश्चितच उल्लेखनीय राहील, असे अशी आशा व्यक्त करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थी गुणगौरव समारंभ लेमन ग्रास हॉटेल, कुडाळ येथे पार पडला. समारंभाचे उद्‍घाटन सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कर्पूरगौर जाधव होते. गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक किरण चौगुले, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, शोभराज शेर्लेकर, शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, शिक्षक संघाचे महेश पालव, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे राजू वजराटकर, झिलू गोसावी, भोसले एज्युकेशन सावंतवाडीचे प्राचार्य गजानन भोसले प्रमुख उपस्थित होते.
संस्थापक एकनाथ जानकर यांनी विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानची माहिती दिली. वंचित घटकांसाठी कार्य करणारे उदय आईर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वेंगुर्ला तालुका संचालक समीर तेंडोलकर, कुडाळचे बाबाजी भोई, सावंतवाडीचे धोंडी वरक, मालवणचे समीर चव्हाण, देवगडचे रघुनाथ बोडेकर, वैभववाडीचे विनोद सरकटे, दोडामार्गचे प्रभाकर राठोड व परीक्षाप्रमुख रामचंद्र झोरे यांना सन्मानित करण्यात आले. कणकवली केंद्र संचालक दिलीप शेळके यांचा रक्तदान चळवळीतील योगदानाबद्दल विशेष सन्मान झाला.
गुरुकुल एज्युकेशन कोल्हापूरचे अध्यक्ष किरण चौगुले यांनी उपक्रमाचे कौतुक केले. श्री. जाधव यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष पांडुरंग चिंदरकर, सचिव रवींद्रनाथ गोसावी, कार्याध्यक्ष दीपक बोडेकर, कोषाध्यक्ष रामचंद्र झोरे, सदस्य योगेश सकपाळ, राजाराम लोटे, विजय मस्के, सागर लाखे, समीर चव्हाण, समीर तेंडुलकर, जयवंत जोशी, दत्तगुरू कांबळी, विलास गोसावी, संतोष गोसावी, राजाराम लोटे, वैदेही गोसावी, रामचंद्र मळगावकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. निशा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. समीर चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com