माखजन येथे महाआरोग्य शिबिर

माखजन येथे महाआरोग्य शिबिर

Published on

माखजन येथे
महाआरोग्य शिबिर
सावर्डेः संगमेश्वर तालुक्यातील शिवसेना उबाठा गट माखजन विभाग व वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्यावतीने माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ४ मे रोजी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व डेरवण हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील व माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या वेळी अॅन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोग शस्त्रक्रिया, मूळव्याध, मुतखडा, पित्ताशयातील खडे प्रोटेस्ट ग्रंथी, मोतीबिंदू, कान-नाक-घसा आदी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच यासोबत अपेंडिक्स, हर्निया, स्तनामधील गाठी, थायरॉईड, मूळव्याध, महिलांचे गर्भाशयातील आजार, चरबीच्या गाठी, मणक्यावरील शस्त्रक्रिया आदी अल्प दरात करण्यात येणार आहेत.
---------
तायक्वांदो खेळाचे
मोफत प्रशिक्षण
साडवलीः १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित संगमेश्वर तालुका तायक्वांदो ॲकॅडमीमार्फत संगमेश्वर तालुक्यातील ९ वर्षांवरील व १७ वर्ष आतील मुले व मुलींकरिता अकादमीमार्फत १ ते ६ मे दरम्यान तायक्वांदो खेळाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरीही तालुक्यातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी सहभागी व्हावे व तायक्वांदो खेळातून मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण, १० वी-१२वी ग्रेस मार्क तसेच क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तायक्वांदो खेळातून मदत होते. हे प्रशिक्षण दळवी वृंदावन मराठा कॉलनी देवरूख नगरपंचायत तायक्वांदो हॉल देवरूख येथे होणार आहे. सायंकाळी ४ ते ५.३०, १ ते ६ मे या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर यांनी केले आहे.
--------
अंजिरा पेडणेकरांची
शंभरी साजरी
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूखजवळील किरदाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यां अंजिरा पेडणेकर यांचा १०० वा (शतक महोत्सव) वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पेडणेकर या मनमिळाऊ व परोपकारी वृत्तीच्या असून, त्यांना नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या आपल्या शेतीवाडीकडे लक्ष देत सामाजिक भान जपत पंचक्रोशीतील विविध कार्यक्रमात भाग घेत अनेकांना मदतीचा हात देत असतात. गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जेवणावळींची जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल रात्री कराओके फेम गायक मनोज ठीक व अभिरूची देवरूख ग्रुपच्या बहारदार संगीत मैफलीने सांगता झाली. या वेळी सुकन्या आशा, सुपुत्र रघुनाथ व नातू सरपंच सुबोध पेडणेकर, सुना, जावई, नातवंड-पंतवडे यांच्यासह पेडणेकर व बने कुटुंबीय यांनी औक्षण करून केक कापला व आजींचा सत्कार केला. या वेळी १०० किलो गुळाची तुला करण्यात आली.
-----------
पाणी नियोजनातून
आर्थिक विकास साधा
राजापूरः धरणाचे पाणी आपल्या शेतापर्यंत तसेच घरापर्यंत आलेले आहे. या पाण्याचे योग्य नियोजन करून शेतीच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन पाटबंधारे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरज नावलीकर यांनी केले. जलसंपदा विभाग व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पिकपद्धती बदल, उत्पादन वाढ आणि पाण्याचे नियोजन इत्यादींबाबत तळवडे येथे कार्यशाळा झाली. या वेळी नावलीकर बोलत होते. या वेळी सुदाम कुंभार, सरपंच गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, अमित चिले, आप्पा साळवी, बालकृष्ण मिशाले, सुरेश गुडेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com