वसुंधरा सुरक्षित राहिली तरच वाढेल आयुष्यमान
rat३०p१८.jpg-
२५N६०९३८
रत्नागिरीः श्रमदानातून नदीची साफसफाई कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे. सोबत कर्मचारी, अधिकारी, ग्रामस्थ.
----
वसुंधरा सुरक्षित तर वाढेल आयुष्यमान
वैदेही रानडे ः पानवल ग्रामपंचायतीत वसुंधरा अभियान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.२: घनकचरा, सांडपाणी, वैयक्तीक तसेच गावाची स्वच्छता ठेवली तर आपली वसुंधरा सुरक्षित राहील आणि आपले आयुष्यमान वाढेल, असे प्रतिपादन करतानाच माझी वसुंधरा अभियान यशस्वी करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानानिमित्त पानवल ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम जागतिक वसुंधरादिनापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राबवण्यास सुरवात झाली आहे. १ मे पर्यंत या अभियानात विविध उपक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आली आहे. पानवल येथील कार्यक्रमात रानडे म्हणाल्या, गावात सर्व कुटुंबांकडील ओला, सुका कचरा, प्लास्टिक, काचा इतर वस्तूंचे वर्गीकरण करून आपल्या गावात तयार झालेले कचरा संकलन शेडचा वापर करावा. ग्रामपंचायतीला यापासून आर्थिक फायदा होईल. पानवल ग्रामपंचायतीत माझी वसुंधरा अभियानानिमित्त श्रमदान मोहीम, नदीची साफसफाई करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, कृषी अधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अभियंता अक्षय बोरसे तसेच रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन शेळके, प्राजक्ता नागवेकर, विस्तार अधिकारी (पं.) तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचयत सदस्य व नागरिक या उपस्थित होते. तनिष्का होरंबे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
---
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.