ऋतिक घाग मंडणगड तालुक्यात प्रथम

ऋतिक घाग मंडणगड तालुक्यात प्रथम
Published on

-rat५p१९.jpg-
KOP२५N६१८७२
ऋतिक घाग
-rat५p२०.jpg-
KOP२५N६१८७३
वैदवी पवार
-rat५p२१.jpg-
KOP२५N६१८७४
ऋतिक खर्सेकर
-----
बारावी निकाल--लोगो

मंडणगड तालुक्यात ऋतिक घाग प्रथम
वैदवी पवार द्वितीय ; ऋतिक खर्सेकर तिसरा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ ः उच्च माध्यमिक परीक्षेत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ऋतिक घाग याने वाणिज्य शाखेत (९१.३३) गुण मिळवत तालुक्यात प्रथम, वैदवी पवार हिने कला शाखेत (८१.८३) गुण मिळवून द्वितीय तर ऋतिक खर्सेकरने (८१.३३) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
महाविद्यालयनिहाय तालुक्याचा निकाल असा ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल ः कला शाखेचा निकाल ८६.६७ टक्के लागला. परीक्षेत ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वैदवी पवार (८१.८३ टक्के), अनुजा गरड (७३.३३), अक्षता पवार (७१.३३) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेत ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऋतिक घाग (९१.३३ टक्के), ऋतिक खर्सेकर (८१.३३), सुविधा लोखंडे (८०.३३) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. पियुष नगरकर (७७.५०), सृष्टी गोसावी (७१.८३), अक्षता यादव (६७.१७) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.
देव्हारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल ९६.२२ टक्के लागला. त्यामध्ये ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुबोधन पवार (८१.१७ टक्के), अजमिना सातारकर (६४.६७), पूजा खैरे (६३.६७) यांनी क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. त्यामध्ये मनस्वी सावंत (६९.१७), सूरज रटाटे (६९.१७), चंदना देवघरकर (६८.८३) यांनी क्रमांक मिळवले.
जर्मन परकार बाणकोट महाविद्यालयाचा निकाल ९४.७ टक्के लागला. त्यामध्ये इकरा दादरकर (८१.१७), रैना हमदुले (६७.३३), इकरा बेग (५७) यांनी क्रमांक मिळवले. कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये नेहा बामणे (६४.५०), श्रद्धा मोडकले (५८.८३), रोहन नलावडे (५७.५०) यांनी क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेचा निकाल ९७.६२ टक्के लागला. त्यातील मेघना यादव (७८.३३), सिद्धी दिवेकर (७७), अनिशा कदम (७६.८३) यांनी क्रमांक मिळवले. कुंबळे महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल ९०.९० टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. कला शाखेत शहब तांबे (७७.१७), सानिका शिगवण (७४.८३), आदित्य गोठल (६२) आणि वाणिज्य शाखेत श्रुती लोखंडे (६८.१७), श्रद्धा पवार (६५.८३), मंजू चव्हाण (६५.६७) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला. टेक्निकल सायन्सचे परीक्षेला बसलेले दोन्ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com