-पाच महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के

-पाच महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के

Published on

दापोली तालुक्याचा निकाल ९३ टक्के
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ६ ः बारावीचा निकाल जाहीर झाला असून, त्यामध्ये दापोली तालुक्याचा निकाल ९३.३५ टक्के लागला आहे. तर तालुक्यातील ५ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
दापोली तालुक्यातून १४१८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१५ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामध्ये १३२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील एकूण १४ महाविद्यालयांपैकी एस. एम. बुटाला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज गावतळे, एस. मेहता कॉमर्स ज्युनिअर कॉलेज दापोली, आर्टस् आणि कॉमर्स कॉलेज हर्णै, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्युनिअर कॉलेज जालगांव आणि न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज टाळसुरे या महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दापोली तालुक्यामध्ये ८० विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, २६२ प्रथम श्रेणी, ६९९ द्वितीय श्रेणी, २८० तृतीय श्रेणी प्राप्त केली आहे. तालुक्यातील महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे- एन. के. वराडकर आणि आर. व्ही. बेलोसे महाविद्यालयातून २५१ पैकी २०६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८२.०७ टक्के निकाल लागला आहे. ए. जी. हायस्कूल, दापोली ४६७ पैकी ४५२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९६.७८ टक्के, पी. डी. दांडेकर कॉलेज केळशी ४२ पैकी ४१ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, ३८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९२.६८ टक्के, व्ही. आर. घोले ज्युनियर कॉलेज, वाकवली ६१ पैकी ६० विद्यार्थी परीक्षेला बसले असून, ४९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८१.६६ टक्के, एस. एम. बुटाला ज्युनियर कॉलेज, गावतळे २९ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के , वेळवी पंचक्रोशी हायस्कूल वेळवी १८ पैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८३.३३ टक्के, नॅशनल हायस्कूल, दापोली २१९ पैकी २१८ परीक्षेला बसले असून २११ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९६.७८ टक्के, रामराजे कॉलेज, दापोली १५३ पैकी १४५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९४.७७ टक्के, एस. मेहता कॉमर्स ज्युनियर कॉलेज, दापोली ५५ पैकी ५५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के, ज्युनियर कॉलेज आर्टस् कॉमर्स हर्णै १४ पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के, सानेगुरूजी आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज, पालगड ३२ पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९६.८७ टक्के, लोकमान्य टिळक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज, चिखलगांव ३४ पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.०५ टक्के, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, जालगांव २ पैकी २ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, टाळसुरे ४१ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com