बहादूरशेखनाका येथे गणेशविसर्जन घाट केव्हा बांधणार 0

बहादूरशेखनाका येथे गणेशविसर्जन घाट केव्हा बांधणार 0

Published on

- rat६p२०.jpg-
25N62112
चिपळूण ः बहादूरशेखनाका येथील गणेशविसर्जन घाटाच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी संवाद साधताना शौकत मुकादम आणि अन्य सहकारी.

बहादूरशेखनाका येथे त्वरित विसर्जन घाट बांधा
शौकत मुकादम ः पूल तोडल्याने नदीत जाण्याचा मार्गच नाही

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल तोडण्यात आल्यामुळे नदीत खाली उतरण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही. येथे चिपळूणसह खेर्डी, कळबंस्ते परिसरातील हजारो भाविक गणेशविसर्जन करतात. पूल तोडण्यापूर्वी गणेशविसर्जन घाट बांधले जाईल, असे आश्वासन दिले होते; मात्र त्या दृष्टीने कार्यवाही झालेली नाही. यंदा ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी तिथे घाट उभारणे आवश्यक आहे अन्यथा गैरसोय होईल. यावरून माजी सभापती शौकत मुकादम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीत खेर्डी, मतेवाडी, काविळतळी, गांधीनगर, कळंबस्ते अशा अनेक गावातील गणपती विसर्जनसाठी येतात; परंतु आता पूल तोडल्यामुळे खाली नदीपात्रालगत जाण्यासाठी रस्ता नाही. त्या ठिकाणी बहादूरशेख व कळंबस्ते येथे गणपती विसर्जन घाट बांधण्यात येतील, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. तीन महिन्यांवर गणपती येऊन ठेपले आहेत तरी या घाटाचा पत्ता नाही. तिथे पालिकेकडून विसर्जन घाट बांधला जाणार असल्याचे महामार्गाचे अधिकाऱ्यांनी सांगितले तर पालिकेचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बोट दाखवतात. सध्या अशीच चालढकल सुरू असल्यामुळे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तीन महिन्याच्या आत विसर्जन घाट झाला नाही तर याद राखा, असेही खडसावले.
----
या प्रश्नाकडेही द्या लक्ष
महार्गालगत सुरू असलेल्या कामाचे साहित्य सर्व्हिस रोडवर आल्यामुळे तिथे अपघात होतात. कळंबस्ते अंडरपास येथे विजेची व्यवस्था नसल्यामुळे अंधाराचा फायदा तळीरामांना होत आहे. एका बाजूला गतीरोधक नसल्यामुळे अपघात होत आहेत. असे अनेक छोट्या-मोठ्या प्रश्नांकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसून चालढकल करत आहेत. त्यामुळे नागरिक व वाहतूक पोलिसांना याचा नाहक त्रास होत आहे, असेही मुकादम यांनी सांगितले.
----
हालचाल रजिस्टरवर नोंद करा
अनेकवेळा वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसतात व साईटवर गेलो, असे सांगतात; परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांची हालचाल रजिस्टरवर नोंद केली जात नाही. त्यामुळे लोकांना हेलपाटे मारावे लागतात. हे साइटवर गेले आहेत की, कुठे हेच लोकांना समजत नाही. तरी कुठल्या साइटवर, कोणत्या जागी, कोणत्या कामासाठी जात आहोत याची नोंद हलचाल रजिस्टरमध्ये नोंद केली पाहिजे, असेही शौकतभाई मुकादम यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com