बीएसएनएलच्या नेटवर्कला ग्रहण
बीएसएनएल नेटवर्कला
आठवड्यापासून ग्रहण
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यात भारत संचार निगमच्या मोबाईल आणि फायबर नेटवर्कची सेवा विस्कळित झाली असून, अनेक सरकारी कामांवर याचा परिणाम झाल्याने तालुकावासियांची गैरसोय झाली आहे. सर्वच ग्रामीण भागात खासगी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क नसल्याने नागरिकांना केवळ भारत संचार निगम लि.च्या सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे; परंतु बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या नेटवर्कसंदर्भात तक्रार किंवा चौकशी केली असता उडवाउडवीची किंवा छापिल उत्तरे मिळतात. सध्याच्या जगात मोबाईल ही अत्यावश्यक सेवा झाली आहे; मात्र संबधित विभागाचा अक्षम्य दुर्लक्षितपणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणतेही सोयरसुतक नसल्याने तालुकावासियांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
---
‘लोकशाही दिनातील
अर्ज मार्गी लावा’
रत्नागिरी ः ज्या विभागाकडे प्रलंबित अर्ज आहेत ते तत्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिन झाला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मागील प्रलंबित अर्जांचाही आढावा घेतला. आज नव्याने ५ अर्ज दाखल झाले आहेत. संबंधित विभागाने मागील प्रलंबित अर्जांसह याची निर्गती करावी.
---
शिष्यवृत्तीची
मुदत २० मेपर्यंत
रत्नागिरी ः अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरिता ३० एप्रिलपर्यंत मुदत होती. ही मुदत समाजकल्याण आयुक्तालयाकडून वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २० मे आहे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी कळवले आहे. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘रोजगार’ या लिंकवर भेट देऊन अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.