हत्तींच्या कळपाने मुक्काम हलवला

हत्तींच्या कळपाने मुक्काम हलवला

Published on

62292

हत्तींच्या कळपाने मुक्काम हलवला

झोळंबेकडे वाटचाल; चंदगडच्या दिशेने जाण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. ७ ः परिसरात गेला आठवडाभर स्थिरावलेल्या हत्तीच्या कळपाने अखेर मुक्काम हलवला. ते तळकटमर्गे झोळंबेच्या दिशेने रवाना झाले. खडपडे मार्गे चंदगडकडे हा कळप जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पाच हत्तींच्या कळपाने कोलझर, तळकट या भागात आठवडाभरापासून मुक्काम ठोकला होता. त्याने बागायतीचे मोठे नुकसान केले होते. यात ‘बाहुबली’ आणि ‘ओंकार’ या टस्करांचा समावेश होता. यावेळी या कळपाचे उपद्रवमुल्य जास्त असल्याने भीतीचे सावट होते. यातील ओंकार या हत्तीने मोर्ले येथे एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याने त्याला पकडण्याचे वनविभागाचे नियोजन होते. त्यामुळे हत्तींच्या हालचालींचा अभ्यास केला जात होता. हा हत्तींचा कळप काल (ता.६) दिवसभर कोलझरच्या जंगलभागात स्थिरावला होता. सायंकाळी त्याने तळकटच्या दिशेने मार्गक्रमन सुरू केले. रात्री उशिरा तो रस्ता ओलांडत झोळंबे येथे दाखल झाला. त्या भागात हत्ती आल्याचे समजताच स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाचे पथकही हत्तींच्या या मार्गक्रमनाने बुचकळ्यात पडले. रात्री उशिरा या कळपाने तेथील महादेव भिडे यांच्या बागेजवळ काही काळ मुक्काम केला. पहाटे ते झोळंबेच्या दिशेने रवाना झाले. हा कळप खडपडेमार्गे डोंगर चढून चंदगडकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कळपातील बाहुबली हा टस्कर या आधी आंबोली, चंदगड भागात होता. इतर चार हत्तींसाठी मात्र हा परिसर नवीन आहे. वनविभागाचे पथक या कळपाच्या पुढच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहे.
--------------
सावंतवाडीच्या दिशेने कूच?
या कळपाने खडपडेकडे न जाता झोळंबे गावाच्या दिशेने मार्गक्रमन केल्यास वनविभागाची डोकेदुखी वाढणार आहे. कारण झोळंबेच्या पलिकडे असनिये हा सावंतवाडी तालुक्याच्या सिमेवरील गाव आहे. तेथे मोठ्याप्रमाणात बागायती आणि पाणी आहे. तेथे स्थिरावून हत्ती पुढे सरकल्यास त्यांचा सावंतवाडी तालुक्यात प्रवेश होणार आहे. तसे झाले तर नुकसानीची तीव्रता कित्येक पटीने वाढणार आहे.
----------------
पकड मोहिमेचे होणार काय?
हत्तींच्या कळपातील ओंकारला पकडण्यासाठी मोहीम आखायला परवानगी मिळाली होती; मात्र याबाबतच्या हालचाली अत्यंत धिम्या आहेत. अद्या या पकडण्याचे स्वरूपही निश्‍चीत झालेले नाही. आता हा कळप चंदगडच्या दिशेने गेल्यास पकड मोहीमेचे काय होणार हा प्रश्‍न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com