विरशेव लिंगायत समाज अध्यक्षपदी माळी

विरशेव लिंगायत समाज अध्यक्षपदी माळी

Published on

‘वीरशैव लिंगायत’
अध्यक्षपदी माळी
खेड ः वीरशैव लिंगायत-जंगम समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी विनय माळी तर उपाध्यक्षपदी प्रवीण छपरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडण्यात आलेली उर्वरित कार्यकारिणी अशी ः सचिव-विशाल जंगम, खजिनदार-बाबासाहेब कुलकर्णी, सदस्य-ओमकार कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, राजेश किट्टद, आनंद हिरेमठ, अविनाश जंगम, नंदकुमार जंगम, अभिजित मनवे; सल्लागार-बाबासाहेब बुरजे, विलास कुलकर्णी; महिला मंडळ अध्यक्ष- विशाखा जंगम, उपाध्यक्ष- विद्या किट्टद, सचिव-प्राजक्ता छपरे, खजिनदार-नमिता माळी, सदस्य- रूपाली कुलकर्णी, गीतांजली छपरे, चैताली बुरजे, सोनाली मनवे, वर्षा लिंगायत, मेघना कुलकर्णी, सल्लागार- कांचन कुलकर्णी, स्मिता बुरजे, महादेवी कुलकर्णी.
---
‘खेड लायन्स सिटी’
अध्यक्षपदी शिरगांवकर
खेड ः खेड लायन्स क्लब ऑफ सिटीच्या अध्यक्षपदी महेंद्र शिरगांवकर, सचिवपदी ओम जाधव तर खजिनदारपदी माणिक लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. लवकरच नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ होणार आहे. उधळे येथील मँगोट्रीट हॉटेलमध्ये झालेल्या सभेत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. उपाध्यक्षपदी अविनाश दळवी यांची निवड करण्यात आली. नगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून उत्तमरित्या सेवा बजावून महेंद्र शिरगांवकर सेवानिवृत्त झाले आहेत. या निवडीबद्दल लायन्स क्लब ऑफ सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
---
डॉ. आंबेडकर
हायस्कूलचे यश
मंडणगड ः पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. प्रशालेतून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे अशी ः हेमांगी मोडकले (पाचवी), वेदिका वाळुंज, श्रीप्रिया केंद्रे, हर्षाली सापटे, अनुराज मर्चंडे, पारस शिरसाठ (सर्व आठवी). सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक शैलेश खताते, बजरंग गावडे, चिंतामणी पिंगळा, शहाजी पाटील, ज्योती राणे, शंकुतला वाघमारे, स्वरा देवघरकर यांनी मार्गदर्शन केले.
---
‘मंथन आर्ट’ चे
१० ला कलाप्रदर्शन
रत्नागिरी ः मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० ते १४ मे या कालावधीत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन मॅकॅन वर्ल्डग्रुपचे सीनिअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्टचे विक्रम ढेंबरे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनामध्ये ११ मे रोजी माजी विद्यार्थ्यांचा गौरव मेळावा आयोजित केला आहे. १२ मे रोजी मंथन आर्ट स्कूलचे डिरेक्टर शशिकांत गवळी यांचे आर्ट स्कूलला प्रवेश घेण्यापूर्वी या विषयी विद्यार्थी-पालकांसाठी मार्गदर्शन असणार आहे. १३ मे रोजी अक्षय पंडित यांचे एआयविषयी मार्गदर्शन होणार आहे. १४ मे रोजी अमर काळे यांचे ''डिजिटल इल्युस्ट्रेशन डेमोस्ट्रेशन'' होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंथन आर्ट स्कूलतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com