१९७१ च्या युद्धात जिल्ह्यातील ३६ जवान शहिद
एअरस्ट्राईकनंतर जवानांनी जागवल्या
निकटवर्तीयांचे डोळे पाणावले ; ३६ जण १९७१ च्या युद्धात शहीद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः भारताने एअरस्ट्राईक करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. नागरिक आनंद व्यक्त करत असतानाच ज्येष्ठ मंडळींना १९७१ मध्ये झालेल्या युद्धाची आठवण आली. त्या युद्धामध्ये जिल्ह्यातील ३६ जवान शहीद झाले होते. आजच्या एअरस्ट्राईक यशानंतर या जवानांच्या आठवणीने निकटवर्तीयांचे डोळे पाणावले.
पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांना गोळ्या घालून मारण्यात आले. त्यामुळे संपूर्ण देशात संताप प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारत सरकारने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे संपूर्ण देशात आनंद साजरा होत आहे. खेड, चिपळूण येथे नागिरिकांनी जल्लोष केला. काहींनी मिठाई वाटली, फटाके फोडले. हा आनंद साजरा होत असताना काही ज्येष्ठ लोकांनी १९६५ आणि १९७१ मधील युद्धाच्या आठवणी जागवल्या. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ जवान शहीद झाले होते. १९६५ मध्ये १८ आणि १९७१ मध्ये १८ जवान शहीद झाले. शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. ही माहिती सांगताना बुजुर्गांचे डोळे नकळत पाणावले. शहीद झालेल्या जवानांमध्ये सर्वाधिक जवान खेड तालुक्यातील आहेत. १६ जवान खेडचे असून, मंडणगड १, दापोली २, चिपळूणचे-७, संगमेश्वरचे -४, गुहागरातील-१, लांजातील-१ जवान शहीद झाल्याची माहिती सैनिक कल्याण कार्यालयातून मिळाली. मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी; पण मुंबईमध्ये राहणारे ३ जवानदेखील या युद्धात शहीद झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.