गोडबोले विद्यामंदिरची प्रगती स्तुत्य
rat८p६.jpg-
२५N६२५१४
रत्नागिरी : केळ्ये येथील गोडबोले विद्यामंदिरात रौप्य महोत्सव सांगता सोहळ्यात स्मरणिकेचे प्रकाशन करताना उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि संस्था पदाधिकारी.
---
गोडबोले विद्यामंदिरची प्रगती स्तुत्य
उदय सामंत ः रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरची प्रगती स्तुत्य अशी आहे. आता संस्थेने रत्नागिरी तालुक्याबरोबरच जिल्ह्यामध्येसुद्धा शिक्षणाचा विस्तार करावा. त्यासाठी उद्योगमंत्री म्हणून जागा उपलब्ध करून देईन. संस्थेने आत्ताच्या काळात तंत्रशिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
गोडबोले विद्यामंदिरच्या रौप्य महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष तथा केंद्रीय ऊर्जा आणि विद्युत राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी, अॅड. विलास पाटणे, सौरभी पाचकुडवे, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर उपस्थित होते.
मंत्री श्रीपाद नाईक यांनी संस्थेच्या सर्व घटक संस्थांबरोबरच या छोट्या युनिटकडे त्याच ताकदीने संस्था लक्ष देत असल्याचे सांगितले. भविष्यामध्ये संस्था तंत्रशिक्षणावर नक्की भर देईल, असे सांगितले. उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी यांनी संस्थापक (कै.) बाबुराव आणि (कै.) मालतीबाई जोशी यांनी सुरू केलेल्या आणि (कै.) अॅड. अरूअप्पा जोशी यांनी विस्तारलेल्या या शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष बहरताना पाहून आनंद व्यक्त करून पुढील मार्गक्रमणासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेला सहकार्य करणारे माजी सरपंच गजानन नाखरेकर, सुहास सहस्रबुद्धे, गोडबोले यांचे पुतणे विकास आणि जयकुमार गोडबोले, श्रीधर घरत यांचे सत्कार सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
----
शोभायात्रेला प्रतिसाद
सोहळ्याचा प्रारंभ शोभायात्रेने झाला. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी व सरपंच सौरभी पाचकुडवे यांच्या हस्ते शोभायात्रेचा प्रारंभ झाला. एका चित्ररथामध्ये शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शाळेमध्ये झालेल्या स्थित्यंतराचा समावेश होता. दुसऱ्या चित्ररथामध्ये माजी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्याची प्रतिकृती साकारली होती. ढोल, लेझिम आणि झांजपथकांनी बहार आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.