नगरपंचायतींसाठी भरघोस निधीची तरतूद हवी
62692
नगरपंचायतींसाठी भरघोस निधीची तरतूद हवी
समीर नलावडे : मुंबईत सोळाव्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने केंद्रीय समितीची बैठक
कणकवली, ता. ९ : लवकरच सोळाव्या वित्त आयोगाचे गठण होणार आहे. त्याअनुषंगाने मुंबईत केंद्रीय समितीची बैठक झाली. या बैठकीत १६ व्या वित्त आयोगामध्ये नगरपंचायतींसाठी भरघोस तरतूद अशी हवी मागणी आपण केली असल्याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात सोळाव्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने केंद्रीय समितीची बैठक झाली. यात कोकण विभागातील नगरपंचायतींचे प्रतिनिधी म्हणून कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नियोजन आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय आयोगाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी नगरपंचायत, नगरपालिका तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली. यावेळी कोकण विभागातील नगरपंचायती, नगरपरिषद यांना वित्त आयोगातून मिळणारा अल्प प्रमाणातील निधी, त्याअनुषंगाने विकास कामे करताना येणाऱ्या अडचणी केंद्रीय समितीसमोर मांडल्या. तर समितीनेही या समस्यांची नोंद घेतल्याची माहिती श्री. नलावडे यांनी दिली.
वित्त आयोगाचा निधी विकास कामांसाठी खर्च करताना १० टक्के स्वहिश्याची रक्कम भरण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र नगरपंचायतींचे मूळातच बजेट कमी असते. अशावेळी दहा टक्के निधी जमा करताना अनेक नगरपंचायतींचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वहिश्शाची अट काढून टाकावी. त्याच प्रमाणे नगरपालिका, नगरपंचायतींची कर वसूली, स्वच्छता उपक्रम या पूर्वीच्या निकषांवर निधीच्या तरतूदीमध्ये वाढ करावी. विविध नियोजित प्रकल्पांच्या भू संपादनासाठी येणाऱ्या खर्चाचीही तरतूद वित्त आयोगाच्या निधीमध्ये करावी अशीही मागणी केंद्रीय समितीपुढे केल्याची माहिती श्री.नलावडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.