भाडेवाढीमुळे दरदिवशी दोन लाखाची भर

भाडेवाढीमुळे दरदिवशी दोन लाखाची भर

Published on

- rat९p१२.jpg-
२५N६२६९८
एसटी बस
---
भाडेवाढीमुळे दरदिवशी दोन लाखांची भर
एसटी महामंडळ ; तीन महिन्यात दीड कोटींचे उत्पन्न, प्रवाशांना फटका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी विभागाला भाडेवाढीचा फायदा झाला असून, एसटीच्या उत्पन्नात दरदिवशी सुमारे दीड ते दोन लाखांची भर पडत आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये रत्नागिरी एसटी आगाराला सुमारे १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीची ओळख आहे; परंतु अनेक वर्षांपासून एसटी महामंडळाचे चाक आर्थिक खोलात आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रयत्न महामंडळाने केले; परंतु त्यांना फारसे यश आले नाही. त्यापैकी कार्गो सेवेने काहीसे एसटीला तारले; परंतु डिझेल, चेसिस, टायर या घटकांच्या किमती वाढल्यामुळे तसेच इतर कारणांमुळे एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या सेवांमध्ये २५ जानेवारीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ केली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. प्रवाशांमधून संताप व्यक्त झाला. काही संघटना, पक्षांनी भाडेवाढ मागे घ्यावी यासाठी आंदोलनेही केली होती; मात्र त्याला न जुमानता भाडेवाढ कायम ठेवली. एसटी बसेसच्या तिकिटात १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे; परंतु त्याचा एसटीच्या भारमानावर फारसा फरक पडलेला दिसला नाही. एसटीच्या सेवेमध्ये दिवसेंदिवस चांगला बदल होताना दिसत असल्यामुळे आणि योजनांचा फायदा होत असल्याने भारमान कायम आहे.
भाडेवाढ केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ९ डेपो मिळून आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. पूर्वी दिवसाला ९ लाखांचे उत्पन्न मिळत होते. आता त्यात वाढ होऊन तब्बल ११ लाख झाले आहे. भाडेवाढ केल्यामुळे दररोज दीड ते २ लाखांचे उत्पन्न वाढले आहे. जवळ अंतरावरील प्रवास केल्यास १० ते २५ रुपयांचा तर लांब पल्ल्याच्या गाडीत प्रवास केल्यास तब्बल ५० ते १५० रुपयापर्यंत भाडेवाढ झाली आहे. एकंदरीत, भाडेवाढ केल्यामुळे एसटीची मालामाल झाली आहे; परंतु प्रवाशांची ओरड सुरूच असल्याचे चित्र आहे.
----
कोट
परिवहन मंडळाच्यावतीने नव्या वर्षात भाडेवाढ करण्यात आली. यामुळे रत्नागिरी आगाराला मोठा फायदा झाला आहे. दिवसाला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्नात वाढ झाली आहे; मात्र असे असले तरी प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत.
- बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com