जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकी अदृश्य
-rat८p३.jpg-
25N62511
रत्नागिरी ः रुग्णालयाच्या पोलिस चौकीला वर्षभरानंतर लागलेला पोलिस चौकीचा बोर्ड.
-----
जिल्हा रुग्णालयातील ‘पोलिस चौकी’ अदृश्य
पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष ; रुग्णांसह नातेवाईकांना शोधावी लागते चौकी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः रुग्ण, अपघातग्रस्तानांना तातडीची मदत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व पोलिस यांच्याकडून मिळते; मात्र येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय अधिकारी मिळतात; पण रुग्णालयातील पोलिस चौकी शोधूनही सापडत नाही. जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांना व रुग्णांना याचा फटका सहन करावा लागत असून, संतापही व्यक्त कऱण्यात येत आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील पोलिस चौकी सध्या अदृश्य आहे. गतवर्षी जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीजवळ पोलिस चौकी होती. इमारतीच्या नूतनीकरणासाठी रुग्णालयाची पोलिस चौकी अपघात विभागात हलवण्यात आली. तिची अवस्था एखाद्या अडगळीत तात्पुरत्या निवासगृहासारखी झाली आहे. ना नावाचा फलक, ना पाण्याची व फोनची सोय. पोलिस चौकीत नित्यनियमाने येतात आपले काम करतात आणि निघून जातात. याकडे प्रभारी शहर पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष झाले असून, याचा फटका थेट नागरिक आणि रुग्णांना सहन करावा लागत आहे.
ज्या ठिकाणी पोलिस चौकी हलविण्यात आली तेथे कोणताही नावाचा बोर्ड नाही. त्यामुळे रुग्ण व अपघाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना पोलिस चौकी शोधावी लागते. मंडणगडपासून ते राजापूरपर्यंतच्या परिसरातून आलेल्या रुग्णांची नोद, मृत्यूची नोंद, अपघाती किंवा हिंसाचाराच्या घटनांतील रुग्ण तसेच कारागृहातून उपचारासाठी आणलेल्या आरोपींची नोंद येथे केली जाते. संवेदनशील कामांसाठी ही चौकी अत्यावशक असून, ती सर्वसामान्यांच्या सहज नजरेस पडेल अशा ठिकाणी असणे गरजेचे आहे; परंतु सध्याची स्थिती अशी आहे की, ही पोलिस चौकी शोधूनही सापडत नाही.
---
इमारतीचे नूतनीकरणानंतरही ही अवस्था
सोशल मीडियावरून याचा समाचार घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या पोलिस चौकीच्या पुढे पोलिस चौकीचा बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना हायसे वाटले आहे; पण प्रशासनाला लवकर शहाणपण आल्याची चर्चा रुग्णांमध्ये रंगली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ याकडे लक्ष देऊन पोलिस चौकीसाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा व योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. पोलिस चौकीच्या इमारतीचे काम होऊन वर्ष लोटले तरी देखील नवीन जागेत पोलिस चौकी का नेली जात नाही, हा यक्षप्रश्न रुग्ण व नागरिकांसमोर ठाकला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.