बागांच्या संरक्षणासाठी करवंदांच्या जाळ्यांची तोड
-rat१०p५.jpg-
२५N६२८६९
पावस ः पावस पंचक्रोशीत ठराविक ठिकाणी करवंदे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत.
-----
बागांच्या संरक्षणासाठी करवंदांच्या जाळ्यांची तोड
रानमेवा होऊ लागला नष्ट ; पावस पंचक्रोशीत प्रमाण अधिक
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः कोकणात आंबा, फणस, कोकम, जांभूळ यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. यातून अनेक व्यवसाय उभे राहिलेले आहेत; मात्र पावस परिसरात करवंदासारखा रानमेवा सध्या नष्ट होऊ लागला आहे. करवंदांच्या जाळ्यांची मोठ्या प्रमाणात बागांच्या संरक्षणाकरिता तोड होत असल्याने करवंदाच्या जाळ्या नष्ट होत आहेत.
करवंदाच्या झाडांची इतर वृक्षांप्रमाणे लागवड होत नाही. त्यामुळे एकदा या जाळ्या तोडल्या की, त्या नष्ट होतात. उन्हाळी हंगामात कोकण मेव्याचा आस्वाद घेण्यासाठी चाकरमानी, पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतात. कोकणातील समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती, पर्यटनस्थळ, मंदिर या सर्वांचे आकर्षण पर्यटकांना आहे. त्याचबरोबर कोकणचा रानमेवादेखील पर्यटकांना आकर्षिक करतो. यावर्षी मात्र या कोकणी मेव्याचे उत्पादनही कमी झाले आहे. सध्या करवंदांची झाडेही तोडली जात असल्याने आणि वणव्यात खाक होत नष्ट होत असल्याने करवंदे मिळणे कठीण बनले आहे.
---
हवामान बदलामुळे उत्पन्न कमी
यावर्षी बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम आंबा, काजूपिकावर झाला आहे. तसाच तो कोकम, जांभूळ, करवंद या मेव्यावरही झाला आहे. काजू ''बी''चा यावर्षी दर स्थिर होता; परंतु आंब्याच्या दरात घसरण होत असून, हंगामही १५ मे पर्यंतच राहील, असे बागायतदार सांगत आहेत. सर्वसाधारणपणे जानेवारी ते जून अशा सहा महिन्यात कोकणात तयार होणारी फळे कुटुंबांचा उदरनिर्वाह सांभाळत होती. फणस तयार झाले की, फणसाची कुयरीची भाजी, कच्च्या फणसाची भाजी, फणसाचे गरे, जांभूळ, करवंद असं सारे पौष्टिक नैसर्गिक खाद्य कोकणात होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.