सर्वोदय छात्रालय हे ऊर्जा केंद्रच

सर्वोदय छात्रालय हे ऊर्जा केंद्रच

Published on

-rat११p१८.jpg-
P२५N६३०७५
रत्नागिरी : सर्वोदय छात्रालयातील छात्र मित्र मेळाव्यात बोलताना हरिश्चंद्र गीते. सोबत दयानंद परवडी, अॅड. संदीप ढवळ, गजानन चाळके, बीना कळंबटे.
----------------
सर्वोदय छात्रालय हे एक ऊर्जा केंद्रच
हरिश्चंद्र गीते ः छात्र मित्र मेळाव्याला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : सर्वोदय छत्रालय हे एक ऊर्जा केंद्र आहे. त्यामुळे वर्षातून एकदा सर्व माजी छात्रांनी मेळाव्याला आवर्जून यावे. असाच प्रतिवर्षी मेळावा होत राहावा. यातून सर्वानाच आनंद मिळतो. छात्रालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. त्यामुळे कोणाच्याही चेहेऱ्यावर असा कंटाळवाणेपणाचा भाव नाही. नकळत टॉनिक मिळतं, असे प्रतिपादन श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते यांनी केले.
सर्वोदय छात्रालयाच्या मोरोपंत जोशी सभागृहात रविवारी विसावा छात्र मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी सर्वोदय मासिक व्याख्यानमाला चालते. चांगले वक्ते आणून रत्नागिरीकरांसाठी ही व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी काही रक्कम ट्रस्टकडे दिली आहे. मी छात्रालयातून चांगले संस्कार, शिक्षण घेतले. आता मी इतरांना मदतीचा हात देईन म्हणजे सर्वोदय होईल. आपले माजी विद्यार्थी म्हणजे एक प्रकारचे सर्वोदय छात्रालयच आहेत.
यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ यांनी सांगितले, सध्या येथे २८ विद्यार्थी राहत आहेत. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ऑगस्टमध्ये बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार दिला जातो. सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार दरवर्षी दिला जातो. संस्थेचे अनेक उपक्रम पुढील काही वर्षात राबविण्यात येणार आहेत. वर्षभरात छात्रालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रंथालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या वेळी मंचावर सदस्य बीना कळंबटे, माजी विद्यार्थी प्रतिनिधी दयानंद परवडी आदी उपस्थित होते. रघुवीर शेलार यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग पेठे यांनी आभार मानले.
---
माजी विद्यार्थी मंडळ
व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके यांनी सांगितले की, १९४९ पासून आजपर्यंत छात्रालयातून १६०० विद्यार्थी शिकून गेले. यातील किमान एक हजार जणांशी संपर्क करायचा आहे. त्याद्वारे माजी विद्यार्थी मंडळ स्थापन करायचे आहे. त्यानंतर निवडक १५ जणांचे मंडळ तयार करण्यात आले.
----
पोटात घ्यावी.)
प्रामाणिक राहून सामाजिक ऋण फेडा ः डॉ. कोदारे
रत्नागिरी : प्रत्येकाने आपल्या सेवेशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहणे म्हणजे सामाजिक ऋण फेडणे. प्रत्येकाने समाजकार्यासाठी पैसेच दिले पाहिजे, असे नाही. मात्र आपल्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्या होणे हीसुद्धा एक समाजसेवा आहे. सर्वोदय छात्रालयातून बाहेर पडलेल्या अनेकांची नाळ सामाजिक कार्यात जोडलेली आहे, याचे श्रेय माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते यांनाच जाते, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाद कोदारे यांनी केले.
यमुनाबाई खेर ट्रस्टच्या छात्र- मित्र मेळाव्यात हरिश्चंद्र गीते व श्रीमती गीते यांनी पुरस्कृत केलेला दुसरा सर्वोदय पुरस्कार डॉ. कोदारे यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यात आणखी पाच हजार रुपयांची भर घालून डॉ. कोदारे यांनी ट्रस्टला देणगी दिली. छात्रालयाचे माजी विद्यार्थी प्रा. प्रकाश मसुरकर यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com