बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विहान, रोनित, शरण्या, शरयू विजेते
63272
बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विहान,
रोनित, शरण्या, शरयू विजेते
कुडाळमध्ये पाच जिल्ह्यांतून स्पर्धक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे प्रथमच घेण्यात आलेल्या ‘कोकणरत्न’ बॅडमिंटन टुर्नामेंट स्पर्धेत एकेरीमध्ये विहान गायकवाड (ठाणे), रोनित जाधव (पालघर), शरण्या औटी (ठाणे), शरयू चुबे (सिंधुदुर्ग) हे विविध गटांमध्ये विजेते ठरले. सर्वच सामने एकतर्फी झाले. सिंधुदुर्गसह ठाणे, पालघर, रायगड व रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतून १०० स्पर्धक सहभागी झाले.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच कोकणरत्न बॅडमिंटन टुर्नामेंट स्पर्धेचे आयोजन १० ते १२ मे या कालावधीत संत राऊळ महाराज कॉलेजच्या बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले. या स्पर्धेचा उद्देश कोकणातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे, युवा पिढीला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ व सक्षम बनविणे व खेळाकडे आकर्षित करणे हा होता. पर्यटनवृद्धीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरली. ही स्पर्धा ११ वर्षांखालील मुले-मुली एकेरी, तेरा वर्षांखालील मुले-मुली एकेरी आणि पंधरा वर्षांखालील मुले-मुली एकेरी व दुहेरी स्पर्धा अशी घेण्यात आली. या स्पर्धेची आज सांगता झाली. स्पर्धेचा निकाल असा ः ११ वर्षांखालील मुले (एकेरी)-विजेता विहान गायकवाड (ठाणे), उपविजेता विनय परब (सिंधुदुर्ग). ११ वर्षांखालील महिला (एकेरी)-विजेती शरण्या औटी (ठाणे), उपविजेती स्वरा कोळी (सिंधुदुर्ग). १३ वर्षांखालील पुरुष (एकेरी)-रोनित जाधव (पालघर), उपविजेता मल्हार कुडाळकर (पालघर). १३ वर्षांखालील महिला (एकेरी)-विजेती शरण्या औटी (ठाणे), उपविजेती
स्वरा कोळी (सिंधुदुर्ग). १५ वर्षांखालील पुरुष (एकेरी)-विजेता प्रणव सामंत (पालघर), उपविजेता साईराज सामंत (सिंधुदुर्ग).
१५ वर्षांखालील महिला (एकेरी)-विजेता शरयू चुबे (सिंधुदुर्ग), विस्मृती नमन (ठाणे). १५ वर्षांखालील पुरुष (दुहेरी)-साईराज सामंत (सिंधुदुर्ग) आणि प्रणव सामंत (पालघर), उपविजेते हर्षद सनये आणि हर्षल सनाय (सिंधुदुर्ग). विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी बॅडमिंटन असोसिएशन महाराष्ट्र राज्य पातळीवरील अधिकारी विजय कोकुमठणकर, नरेंद्र सावर्डेकर, आर्यन कदम, मनस्वी हडसे, मनस्वी चोपडे, मिस वंशिता, कोकण बॅडमिंटन टुर्नामेंटचे सचिव डॉ. अमोघ चुबे, अॅड. सुहास सावंत, नंदकुमार प्रभुदेसाई, राज चव्हाण, योगेश नाडकर्णी, समीर साखळकर, किरण सावंत, जयेश धुरी, प्रथमेश सावंत, भालचंद्र सावंत, विलास कोरगावकर आदींसह पाचही जिल्ह्यांतील खेळाडू, पालक व बॅडमिंटनप्रेमी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.